Goa Farmer: शेतजमीन पूर्ववत करून द्या; शेतकऱ्यांची मागणी

Goa Farmer: शेतकऱ्यांची मागणी: आंदोलन करण्याचा इशारा
Goa Farmer
Goa FarmerDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farmer: स्थानिकांना काम देत नसाल, तर खाण व्यवसायामुळे उद्ध्वस्त झालेली शेतजमीन सुपीक करून पूर्ववत आम्हांला द्या, अशी पिळगावमधील शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे. ही मागणी पदरात पाडून घेण्यासाठी संघटित झालेल्या पिळगावमधील शेतकऱ्यांनी आज (बुधवारी) डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.

Goa Farmer
Goa Police: सोने तस्करीची पोलिसांकडून गंभीर दखल

आमची शेती आम्हांला मिळाली नाही, तर खाण कंपनी विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेताना सारमानस-पिळगाव रस्त्यावरुन खनिज वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात येईल. प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल. असा स्पष्ट इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

वेदांता (सेझा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना घरी पाठवल्याने पिळगावमधील शेतकरी आता आक्रमक बनले आहेत. स्थानिकांना कामावर घेत नसाल, तर आमच्या शेती पूर्ववत आम्हांला द्या. अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

पिळगावमधील कामगारांना खाण कंपनीने घरी पाठविल्याने कामगारांसह स्थानिक शेतकरी आता संघटित आणि आक्रमक झाले आहेत. शेतीच्या मागणीसाठी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी सारमानस येथे धरणे धरले होते.

तर खनिज वाहतूक रोखणार

नुकसान भरपाई सोडाच, उलट आता खाण कंपनीकडून स्थानिक कामगारांच्या पोटावर पाय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्ही करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या शेतजमिनी आम्हांला हव्या आहेत.

Goa Farmer
Mopa Airport: मोपा परिसरात तीन हॉटेल्स; महसूल मात्र नगण्यच

शेतीतील गाळ काढून आमच्या शेती आम्हांला द्या. अशी मागणी सुधाकर वायंगणकर, रमेश कवळेकर आणि अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सारमानस रस्त्यावरून खनिज वाहतूक करायला देणार नाही. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वेळप्रसंगी न्यायालयात मागण्यात येईल, असे सुधाकर वायंगणकर यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com