Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Chawdi Robbery News: दरोड्यांच्या घटनांनी राज्य हादरले असतानाच चावडी येथील भर बाजारात सोमवारी मध्यरात्री सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला.
Chawdi Robbery News
Goa Robbery IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: दरोड्यांच्या घटनांनी राज्य हादरले असतानाच चावडी येथील भर बाजारात सोमवारी मध्यरात्री सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतकर्तमुळे हा प्रयत्न फसला असला तरी परिसरात या घटनेमुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे.

चोरट्यांनी साई ज्वेलर्स दुकानाचे शटर फोडले व सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून प्रवीण वेर्णेकर यांच्या घराबाहेरील व दुकानाबाहेरील सीसीटीव्ही निकामी केले. दुकानाचे कुलूप व शटर तोडण्यासाठी त्यांनी टिकाव, पिकास तसेच अन्य धारदार हत्यारांचा वापर केला. चोरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हत्यारे त्याच ठिकाणी टाकून पोबारा केला. पोलिसांनी उशिरापर्यंत चोरट्यांना शोध घेतला मात्र, चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले. जात असताना त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली.

Chawdi Robbery News
Goa Robbery Case: धारदार शस्त्राचा धाक दाखवून 24 लाख लाटले! पर्वरी पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, 5 जण अटकेत

चोरट्यांचा खाद्यपदार्थांवर ताव

चोरट्यांनी येताना खाद्यपदार्थ आणले होते. तिथेच त्यांनी या पदार्थांवर ताव मारला. त्यामुळे हे चोरटे घटनास्थळी दोन ते तीन तास होते, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथक बोलावून चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या दुकान मालकाचे घर दुकानाच्या शेजारीच असल्याने घरमालक घरातून बाहेर येऊ नयेत, म्हणून दाराच्या कडीला दोरीने बांधले. गस्तीवरील पोलिसांना खटखट असा आवाज आल्याने पोलिसांनी त्याचा मागोवा घेत दुकानाकडे मोर्चा वळविला. पोलिस येत असल्याचे समजताच चोरट्यांनी पोबारा केला.

दुसरीकडे, बायणा परिसरातील दरोडा प्रकरणात तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, हा गुन्हा ‘उकलला’ आहे, परंतु इतर संशयितांचा शोध सुरू असून त्यांच्यासुद्धा लवकरच कारवाई होईल. बायणा येथील ‘चामुंडी आर्केड’ या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील एका घरात आठवडाभरापूर्वी मध्यरात्री दरोडा पडला होता.

Chawdi Robbery News
Tourists Robbery in Goa: कळंगुट बीचवर मसाज करण्याच्या बहाण्याने पर्यटकांची लुबाडणूक; 34 दलालांवर गुन्हा

पोलिसांच्या मते, हे हल्ला खूप नियोजित होता. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे टाळले, गेट उघडले आणि खिडकी फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांच्या आठवडाभरात काहीच न लागल्याने बायणा, सडा, बोगदा भागातील जागृत नागरिकांनी आज मुरगाव पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला.

मुरगाव पोलिस ठाण्‍यावर मोर्चा

राज्‍यात एकामागोमाग एक दरोडे पडत असल्‍याने भयभीत झालेल्‍या नागरिकांनी मुरगाव पोलिस ठाण्‍यावर आज मोर्चा काढला. पोलिसांनी कार्यक्षमता वाढवली पाहिजे, अशी त्‍यांनी भावना व्‍यक्‍त केली.

Chawdi Robbery News
Baina Robbery Case: पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे, 6 दिवस उलटूनही बायणा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास लागेना

वर्षा शर्मा, उपमहानिरीक्षक

बायणा दरोडा प्रकरणात आणि इतर ठिकाणी झालेल्या दरोडा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात आमची चौकशी आणि तपास योग्य दिशेने सुरू असून योग्यवेळी आम्ही याबाबत माहिती देणार आहोत.

पोलिसांची सतर्कता..:

म्हापसा, मडगाव, वास्को (Vasco) येथील दरोड्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा काणकोणमध्ये वळविला आहे. गस्तीवरील पोलिस यशवंत देसाई व जगदीश गावकर यांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला. त्यांना तीन वेळा काही तरी तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी दोन वेळा सराफी दुकानाच्या आजूबाजूला पाहणी केली. तिसऱ्यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक करून तेथून पोबारा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com