Pink Eye Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pink Eye Care: घरात गुलाबी डोळ्यांचा रूग्ण असेल तर 'या' 4 गोष्टींची काळजी घ्या

गुलाबी डोळ्यांची समस्या वाढत चालली असून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

Puja Bonkile

Pink Eye Prevention Tips: गुलाबी डोळ्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. डोळ्यांशी संबंधित या संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. तुमच्याही घरात गुलाबी डोळ्यांचे रुग्ण असतील तर तुम्ही काय कराल हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे. 

या आजारापासून दूर राहण्यासाठी काही नियमांचे पालन केरणे गरजेचे आहे. यासाठी कोणत्या गोष्टीं लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

तुमच्या घरात कोणाचा डोळा गुलाबी असेल तर काय करावे?

  • संसर्ग असलेल्या व्यक्तींच्या वस्तूंपासून दूर राहावे

जर तुमच्या घरात कोणाला गुलाबी डोळ्याचा त्रास होत असेल तर सर्वात पहिले त्याच्या वैयक्तिक गोष्टींपासून दूर राहावे. मग ती त्याची पाण्याची बाटली असो किंवा इअरफोन्स असो. कोणत्याही गोष्टीला स्पर्श करणे टाळावे.  जर तुम्ही चुकून एखाद्या गोष्टीला स्पर्श केला तर लगेच हात स्वच्छ धुवावे. यानंतरही डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.

  • संसर्ग असलेल्या व्यक्तींचा टॉवेल आणि सनग्लासेस वापराणे टाळावे

संक्रमित व्यक्तीचे टॉवेल आणि सनग्लासेस वापरणे हे सर्वात जास्त संसर्गजन्य असू शकतात आणि त्यांच्या संपर्कात येऊन तुम्ही देखील या आजाराचे बळी होऊ शकता. त्यामुळे टॉवेल आणि सनग्लासेसला स्पर्श करणे टाळा. फक्त स्वत:च्या वस्तु वापराव्या.

  • सनग्लासेस वापरावे

तुमच्या घरातील कोणी सांसर्गिक असले तरी तुम्ही त्यांच्यासमोर सनग्लासेस लावून बसू शकता. यासाठी काळा चष्मा वापरणे योग्य राहते. यामुळे तुम्हाला कोणताही संसर्ग होणार नाही.

  •  मेकअप करणे टाळावे

जर तुमचे डोळे आले असेल तर डोळ्यांचा मेकअप करणे टाळावे. कोणत्याही प्रकारचा मेकअप तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो आणि त्याचा तुमच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे संसर्ग आणखी वाईट होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्या घरात कोणाला ही समस्या असेल तर तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT