Simple Tips For Eating Right in the Monsoon Season: पावसाळ्यात कोणता आणि किती आहार घ्यावा याकडे लक्ष दिले पाहिजे. काही लोक पावसाळ्यात भाज्या न काण्याचा सल्ला देतात.तर कधी पावसामुळे कंदमुळ न खाण्याचा सल्ला देतात. पण पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा कोणता नाही हे तज्ञांकडूनच जाणून घेऊया. कारण पावसाळ्यात आतडे नाजुक होतात यामुळे कोणतेही पदार्थ खाल्यास लगेच पोटाचे आजार उद्भवू शकतात.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा कोणता आहार घ्यावा?
तज्ञांच्या मते, पावसाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा उकडलेले शेंगदाणे खाणे गरजेचे आहे. तसेच मोड आलेले कडधान्यांचे सेवन करावे. यामध्ये मोड आलेली मटकी, मुग यांचा समावेश करावा. पावसाळ्यात मिळणारा मका, दूध, काकडी, भोपळा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. कंदमुळांमध्ये तुम्ही बीटचे सेवन करू शकता.
आठवड्यातून एकदा कोणता आहार घ्यावा?
बाजरीची भाकर , राजगिरा आठवड्यातून एकदा तरी खाणे आवश्यक आहे. मिळणाऱ्या हंगामी भाज्यांचा जेवणात समावेश करावा. . पावसाळ्यात जीभेचे चोचले पुरविणारे गरमागरम भजी देखील खावीत. याशिवाय मशरूम, बांबूपासून बनवलेली डिश किंवा दोन ते तीन महिने जुने लोणचे खाऊ शकता.
पावसाळ्यात फिट राहण्यासाठी काय करावे
कोमट पाणी प्यावे
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते. पावसाळ्यात दुषित पाणी पिल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यामुळे घशाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो.
हळदीचे दूध पावसाळ्यात फायदेशीर
हळदीचे दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स कगुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे रात्रीची झोप सुधारते आणि वेदना आणि थकवा दूर होतो.
फळांचे सेवन
पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करावा. फळ खाणे आरोग्यासाटी फायदेशीर असते.फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. सफरचंद, संत्री, केळी, पपई यासारखे फळ खावी.
लवंग-मिरपूड आणि दालचिनीचा काढा
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा रामबाण उपाय म्हणून काम करतो. पावसात इन्फेक्शनचा धोका खूप वाढतो, अशा वेळी डेकोक्शनचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढा तयार करून प्यावा. यामुळे घसा खवखवणे आणि अशा इतर समस्या दूर होतील आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी मजबूत होईल.
तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.