Home Remedies For Tech Neck Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies For Tech Neck: तासंतास मोबाईल-कॉम्प्युटरवर बसल्याने वाढू शकतो 'टेक नेक'चा धोका, 'या' उपायांचा करा वापर

दैनिक गोमन्तक

Home Remedies For Tech Neck: आज फोन, कॉम्प्युटर-लॅपटॉपने आयुष्य खूप सोपे केले असेल, पण त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम नाकारता येत नाहीत.ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑफिस मीटिंग आणि मित्रांशी गप्पा मारणे फोन आणि लॅपटॉपशिवाय शक्य नाही.

अनेक आरोग्य अभ्यास दाखवतात की बहुतेक लोक दिवसातील 24 तासांपैकी किमान 9 ते 10 10 तास त्यांच्या फोन आणि कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसून घालवतात. त्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अशीच एक समस्या आहे टेक नेक. याची लक्षण आणि यावर उपया काय हे जाणुन घेउया.

का होते टेक नेक

जेव्हा एखादी व्यक्ती फोन किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करत असताना सतत अनेक तास मान झुकवून बसते तेव्हा पाठीचा कणा आणि मानेच्या स्नायूंवर जास्त ताण येतो.

त्यामुळे व्यक्तीची शारीरिक स्थिती बिघडते आणि मान आणि मणक्यामध्ये समस्या निर्माण होतात. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने पाठीच्या कण्याला फुगवटा वाढण्यासोबत मान, पाठ, खांदे आणि डोके दुखते.ही समस्या टेक नेक म्हणून ओळखली जाते.  

टेक नेकची लक्षणे

टेक नेकचे पहिले लक्षण म्हणजे पीडित व्यक्तीची मान, पाठ आणि खांदे सतत दुखणे. 
आणखी एक लक्षण म्हणजे पाठ आणि खांद्यामध्ये जडपणा. डोके पुढे किंवा मागे हलवताना पीडितेला वेदना जाणवते. खांदे गोल आकारात वाकलेले असावेत. 

या घरगुती उपायांनी मानेच्या समस्येपासून मिळेल आराम - 

  • तेलाची मसाज
    मानदुखी, सूज आणि घशातील जडपणा यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मोहरी, लॅव्हेंडर, लवंग अशा कोणत्याही गरम तेलाने मानेची मालिश करू शकता. असे केल्याने पाठीचे आणि मानेचे स्नायू शिथिल होतात, ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो. 

  • हिंग आणि कापूर उपाय
    मानदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हिंग आणि कापूरची मदत घेऊ शकता.हा उपाय करण्यासाठी हिंग आणि कापूर समप्रमाणात घेऊन मोहरीच्या तेलात चांगले मिसळा. आता हे मिश्रण मानेवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.हा उपाय केल्याने दुखण्यात आराम मिळतो. 

  • बर्फाचा उपाय
    मानेचे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळवण्यासाठी आईस पॅक देखील एक चांगला उपाय आहे. बर्फाच्या वापराने वेदना बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात. बर्फाचा हा उपाय दिवसातून सुमारे पाच मिनिटे करा. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT