Summer Special Chutney
Summer Special ChutneyDainik Gomantak

Summer Special Chutney: कैरीची चटणी उन्हाळ्यात फक्त चव नाही तर आरोग्यासाठीही बेस्ट

या उन्हाळ्यातील खास चटणी पोटाच्या अनेक समस्या दूर करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
Published on

Summer Special Chutney: उन्हाळा सुरू होताच आंबट खाण्याची इच्छा होते. अशा वेळी कैरीची चटणी जेवणासोबत दिल्यास तोंडाची चव आणि भूक दोन्हीही दूर होतात. कच्च्या कैरीची चटणी ही खाण्यास अतिशय चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असते.

या उन्हाळ्यातील खास चटणी पोटाच्या अनेक समस्या दूर करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. चला तर मग या उन्हाळ्यात कच्च्या कैरीच्या चटणीचा आस्वाद घेण्यासाठी ही रेसिपी फॉलो करूया.

  • कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- २ कैरी

- २०० ग्रॅम कोथिंबीर

- ५-६ हिरव्या मिरच्या

- ७-८ पाकळ्या लसूण

- १/२ टीस्पून भाजलेले जिरे

- २ खोबऱ्याचे तुकडे

- १ टीस्पून लिंबाचा रस

- १ टीस्पून साखर

- चवीनुसार मीठ

- आवश्यकतेनुसार पाणी

  • कृती

कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी प्रथम कैरी स्वच्छ धुवा आणि सुती कापडाने पुसून घ्या.

नतंर कैरी सोलून त्याचे छोटे तुकडे करा.

यानंतर धुतलेल्या कोथिंबीर चिरून घ्या.

आता मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या, लसणाचे तुकडे आणि कैरीचे तुकडे, कोथिंबीर टाकून बारीक करून घ्या.

आता त्यात भाजलेले जिरे, नारळाचे तुकडे, १ चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून चटणी बारीक करा.

आता पुन्हा एकदा मिक्सीचे झाकण उघडा आणि थोडे पाणी घालून चटणी पुन्हा बारीक वाटून घ्या.

आता एका भांड्यात चटणी काढा आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भाताबरोबर किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com