Cervical Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग का होतो? कारण, लक्षणे आणि उपचार

Cervical Cancer Awareness Month: खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बेफिकीरपणामुळे महिला सर्व्हायकल कॅन्सरसारख्या गंभीर समस्येला बळी पडत आहेत.

Manish Jadhav

Cervical Cancer: कॅन्सर ही सध्या वेगाने पसरणारी गंभीर समस्या बनत चालली आहे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बेफिकीरपणामुळे महिला सर्व्हायकल कॅन्सरसारख्या गंभीर समस्येला बळी पडत आहेत.

जगभरात अनेक महिला सर्व्हायकल कॅन्सरने ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत याबाबत जागरुक होणे गरजेचे आहे. सर्व्हायकल कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जानेवारी हा महिना 'सर्व्हायकल कॅन्सर अव्हेरनेस मंथ' म्हणून साजरा केला जातो. चला तर मग वेगाने पसरत चाललेल्या या कॅन्सरविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

पॅपिलोमा विषाणू

दरम्यान, सर्व्हायकल कॅन्सर हा पॅपिलोमा विषाणू (HPV) नावाच्या विषाणूच्या संसर्गामुळे होतो. जगभरातील सर्व्हायकलची 25 टक्के प्रकरणे आणि मृत्यू भारतात (India) होतात. अंदाजे दर 47 मिनिटांनी एका महिलेला सर्व्हायकल कॅन्सर झाल्याचे निदान होते आणि भारतात दर 8 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो.

सर्व्हायकल कॅन्सरची कारणे

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस

आनुवंशिकता

धूम्रपान

स्वच्छतेचा अभाव

कुपोषण

असुरक्षित लैंगिक संबंध

प्रारंभिक संकेत

वारंवार लघवी लागणे

छातीत जळजळ होणे

मासिक पाळी अनियमित येणे

भूक न लागणे किंवा खूप कमी खाणे

खूप थकल्यासारखे वाटणे

वारंवार सौम्य ताप आणि सुस्ती

लैंगिक संभोगानंतर रक्तस्त्राव

मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव

सर्व्हायकल कॅन्सर कसा टाळावा

सर्व्हायकल कॅन्सरचा प्रतिबंध किशोरावस्थेतच सुरु होतो. महिलांमध्ये हा संसर्ग रोखण्यासाठी एचपीव्ही लस खूप उपयुक्त ठरते. याशिवाय, नियमित स्मीअर चाचण्यांद्वारेही हा गंभीर आजार टाळता येतो. तसेच, योग्य वेळी लसीकरण (Vaccination) आणि निरोगी जीवनशैली देखील हा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त आहे. या सर्वांशिवाय, तुम्ही इतर काही गोष्टींद्वारे देखील या गंभीर समस्येपासून स्वतःला वाचवू शकता.

धूम्रपानापासून दूर राहणे

निरोगी आहार घेणे

सुरक्षित लैंगिक संबंध

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी

एचपीव्ही विषाणूविरुद्ध लसीकरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT