Heart Attack, Brain Stroke आणि Cancer चा धोका कमी करते 'हे' गुणकारी तेल, पण... खरेदी करण्यापूर्वी हा लेख वाचा

Olive Oil Health Benefits: ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर स्तनाचा कर्करोग आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
Olive Oil Health Benefits: ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर स्तनाचा कर्करोग आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
Olive Oil Health BenefitsSocialMedia
Published on
Updated on

Olive Oil Health Benefits

प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकात तेलाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहितीये का की काही प्रकारचे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल कर्करोगास कारणीभूत ठरू शकते तर काही तेल अशा धोकादायक आजारापासून बचाव करण्याचे काम करतात. संशोधकांना कर्करोगाच्या ट्यूमरपासून संरक्षण करणारे खाद्यतेल सापडले आहे.

एवढेच नव्हे तर कर्करोगाशिवाय हे तेल हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातापासूनही बचाव करते. पण भारतात हे तेल क्वचितच स्वयंपाकासाठी वापरले जाते. याला ऑलिव्ह ऑइल म्हणतात. चला तर जाणून घेऊया कॅन्सरमध्ये हे तेल का आणि कसे फायदेशीर आहे तसेच ते खाण्याचे काय फायदे आहेत?

Olive Oil Health Benefits: ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर स्तनाचा कर्करोग आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
Goa Politics: भ्रष्टाचाराच्या कॅन्सरने पोखरलंय; सरदेसाईंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच डिवचलं

कर्करोगात पेशी जलद गतीने वाढू लागतात. सामान्य भाषेत त्यांना ट्युमर किंवा गाठ म्हणतात. वेगवेगळ्या संशोधनांतून असे आढळून आले की, नियमित ऑलिव्ह ऑइलचा वापर स्तनाचा कर्करोग आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो. हा अभ्यास Lipids in Health and Disease मध्ये प्रकाशित झाला आहे. ऑलिव्ह ऑइल इतर प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी देखील आढळले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, जगात सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळे होतात. ज्यामध्ये हार्ट अटॅकची संध्या अधिक आहे. ऑलिव्ह ऑइल धोकादायक LDL कोलेस्टेरॉल आणि जळजळ कमी करण्याचे काम करते.

कोलेस्टेरॉलमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. यामध्ये मेंदूला रक्त वाहून नेणाऱ्या धमनीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण व्यवस्थित पोहोचत नाही. ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने हानिकारक कोलेस्ट्रॉल तयार होण्यास मदत होत नाही.

Olive Oil Health Benefits: ऑलिव्ह ऑइलचा नियमित वापर स्तनाचा कर्करोग आणि पचनसंस्थेच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
Suleman Khan: 'माझा Encounter करण्याची धमकी, पोलिसांनीच सोडले हुबळीत, 12 जणांचा सहभाग'; फरार सुलेमानचा पहिला Video Viral

ऑलिव्ह ऑइल खाण्याचे फायदे

- वजन वाढत नाही

- अल्झायमर विरुद्ध लढ्यात फायदेशीर

- टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो

- संधिवात प्रतिबंधित करते

- अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म प्रदान करणे

साधारणपणे ऑलिव्ह ऑइल सॅलड ड्रेसिंग, सॉटे इत्यादीसाठी वापरले जाते. पण USDA च्या फूड सेफ्टी अँड इंस्पेक्शननुसार, त्याचा स्मोक पॉइंट बराच जास्त आहे. त्यामुळे याचा वापर डीप फ्राईंगसाठीही करता येतो.

Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारासाठी पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com