Weight Loss Snacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Snacks: डाएट न करता वजन कमी करायच असेल तर आजच सुरू करा 'हे' काम

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सहज करू शकता. यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही.

Puja Bonkile

Weight Loss Snacks: अनेक लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण अनेक तास जीममध्ये घालवून किंवा डाएट करून देखील वजन कमी होत नाही. पण आता वजन कमी करण्यासाठा तुम्हाला घाम गाळायची गरज नाही. तुम्ही स्नॅक्सचे सेवन करून वजन कमी करू शकता. वजन नियंत्रणात असेल तर अनेक आजार देखील दूर राहतात.

मखाणा 

नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात तुम्हाला खावेसे वाटत असल्यास, तुम्ही तुमच्या स्नॅक्समध्ये मखनाचा समावेश करू शकता. यामध्ये असलेले अमीनो अॅसिड तुमचे शरीर निरोगी ठेवते. हे चयापचय वाढवते. तसेच कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. त्याचा परिणामही तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. यामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते.  

भेल पुरी 

भेळ पुरीचा समावेश फराळमध्ये करू शकता. हे टोमॅटो, कांदा, मुरमुरे, लिंबू आणि शेंगदाणे टाकून बनवले जाते. हे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हा पदार्थ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

स्प्राउट

वजन कमी करण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाण्याचा उत्तम पर्याय आहे. हा तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी स्नॅक्सपैकी एक आहे. त्यामुळे पोटही भरलेलं वाटतं आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. 

ढोकळा

चवीला किंचित गोड आणि मिरचीसह मसालेदार, ढोकळा प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये याचा समावेश करू शकता. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे वजन वाढणार नाही. 

कणीस

भाजलेले कणीस खूप चवदार असतो. त्यात लिंबू आणि मीठ घातल्याने त्याची चव आणखी वाढते. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे वजन कमी करण्यास मदत करते. परंतु दोन किंवा अधिक कणीस एकत्र खाऊ नका. याचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

ग्रीन टी

जर तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी चहा प्यावासा वाटत असेल तर दुधाच्या चहाऐवजी हर्बल चहा किंवा मसाल्याचा चहा प्यायला सुरुवात करा. हे तुमच्या पोटातील उष्णता काढून टाकते आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवते. पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्याचे काम करते. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT