Curry Leaves  
लाइफस्टाइल

Curry Leaves Health Benefits: वाढलेले वजन होईल कमी, साखर राहिल नियंत्रणात; 'या' झाडाची पाने ठरतील खूपच फायदेशीर

Weight Loss And Sugar Control Tips: रक्तातील साखरेची पातळी नेहमीच उच्च राहत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचे सेवन करू शकता.

गोमंतक ऑनलाईन टीम

खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात कढीपत्त्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की चवीसोबतच कढीपत्त्याचे सेवन आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या पानांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे आणि जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्त्वे आढळतात. आरोग्यसंबधित विविध समस्यांवर कढीपत्ता खाण्याचा सल्ला दिला जातो.

कढीपत्ता खाल्ल्याने काय - काय फायदे मिळतात?

१) जर तुमची त्वचा खूप खडबडीत आणि कोरडी झाली असेल तर तुम्ही कढीपत्त्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होते. हे त्वचेला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी देखील मदत करतात.

२) तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नेहमीच उच्च राहत असेल तर तुम्ही कढीपत्त्याचे सेवन करू शकता. कढीपत्त्याच्या पानात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात, त्यामुळे याच्या सेवनाने साखरेची पातळी वाढत नाही आणि नियंत्रणात राहते.

३) कढीपत्त्यात टॅनिन आणि कार्बाझोल अल्कलॉइड्ससारखे घटक असतात, ही पाने यकृताचे आरोग्य सुधारतात.

४) कढीपत्त्यात डायक्लोरोमेथेन, इथाइल एसीटेट यांसारखे आवश्यक घटक आढळतात. याच्या सेवनाने शरीरातील चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे वजन कमी होते. जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे पाणी पिऊ शकता.

५) सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चघळल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यात लोह आणि कॅल्शियम देखील असते. कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करतात.

६) कढीपत्ता चघळल्याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते. यामध्ये आढळणारे एन्झाईम्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. जर तुम्ही कढीपत्ता नियमितपणे चघळत असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते.

७) कढीपत्त्याच्या सेवनानेही दृष्टी देखील सुधारते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

कोणी कढीपत्ता खाऊ नये?

कढीपत्त्याच्या दुष्परिणामांबद्दल फारशी माहिती नसली तरी. याबाबत सध्या कोणताही मोठा अभ्यास समोर आलेला नाही. तरीही स्तनपान करणाऱ्या माता, ज्यांचा रक्तदाब अनियंत्रित आहे आणि लहान मुलांना कढीपत्ता खाऊ घालणे टाळावे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT