Mumbai Goa Highway: खूशखबर! मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ कमी होणार; NHAI बांधणार 30 किमी लांबीचा 'एक्सप्रेस वे'

Mumbai Goa Highway: भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील जोडला जाईल.
Mumbai Goa Highway: खूशखबर! मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ कमी होणार; NHAI बांधणार 30 किमी लांबीचा 'एक्सप्रेस वे'
Mumbai Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Goa Highway

मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नवीन एक्सप्रेस वे बांधणार आहे. हा द्रुतगती मार्ग जेएनपीटीजवळील पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत 30 किमी लांबीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 3,700 कोटी रुपये खर्च येणार असून 30 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

यामुळे एमटीएचएल (अटल सेतू) ते गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते गोवा या महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

हा द्रुतगती मार्ग उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग अशा अनेक महत्त्वाच्या महामार्गांना जोडेल. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील जोडला जाईल.

तसेच तो वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. यामुळे बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होईल आणि जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईल.

Mumbai Goa Highway: खूशखबर! मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ कमी होणार; NHAI बांधणार 30 किमी लांबीचा 'एक्सप्रेस वे'
Rescue Operation: विहिरीत पडलेल्या रानटी डुक्कराला तर, नाल्यात अडकलेल्या गायला जीवदान

हा नवीन एक्स्प्रेस वे अटल सेतूच्या शिवडी टोकाला असलेल्या कोस्टल रोडला आणि वरळीजवळील सी लिंकला जोडेल. त्याचा पुढील विस्तार अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि पडघाजवळील नाशिक महामार्ग (मोरबे, कर्जत, शेलू, वाघणी आणि बदलापूर मार्गे) यांना जोडतील. हा दिल्ली-मुंबई कॉरिडॉरच्या वडोदरा-मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाही भाग असेल.

Mumbai Goa Highway: खूशखबर! मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ कमी होणार; NHAI बांधणार 30 किमी लांबीचा 'एक्सप्रेस वे'
Goa Crime: चार वर्षीय जुळ्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, 5 लाखांचा दंड

NHAI लवकरच या कामाचा कार्यादेश जारी करुन, येत्या सात महिन्यांत बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कॉरिडॉरमुळे 10,000 हून अधिक वाहनांसाठी वाहतूक सुरळीत होणार आहे. यामुळे मल्टी-एक्सल कंटेनर ट्रक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.

नव्या एक्स्प्रेस वेमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे, असे NHAI च्या प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com