Washing Machine Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Washing Machine: वॉशिंग मशीन वापरताना 'या' ट्रिक्सचा करा वापर, मिटेल बिलाची चिंता

वॉशिंग मशीन कपडे धुतांना या ट्रिक्स वापरल्या तर बीलाची बचत होईल.

Puja Bonkile

Washing Machine: आजकाल प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. मशीनमुळे कपडे स्वच्छ करणे सोपे झाले आहे. पण वॉशिंग मशीन वापरतांना काही ट्रिक्स वापरल्यास वीज बिल कमी येऊ शकते.

  • क्विक मोडचा वापर करावा

क्विक मोडमध्ये वॉशिंग मशीनचा वापर केल्यास बिलाची बचत होऊ शकते. यामध्ये कपडे कमी वेळात स्वच्छ होतात. यामुळे वेळेची आणि वीजेची बचत होते.

  • थंड पाण्याचा वापर

वॉशिंग मशिनमध्ये गरम पाण्याने कपडे धुतले तर वीज जास्त लागते. यामुळे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. यामुळे वीजची बचत होऊन बील कमी येते. तसेच थंड पाणी वापरल्याने कपड्यांचा रंग देखील खराब होत नाही.

  • एकाच वेळी कपडे धुवावे

वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी कपडे धुणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे वीजेची बचत होऊन बिल कमी येऊ शकते. एकाच वेळी अधिक कपडे धुणे म्हणजे तुम्हाला मशीन वारंवार चालू आणि बंद करावी लागत नाही. मशीन ओव्हरलोड होणार नाही याची काळजी घ्यावी.

Washing Machine
  • इको मोडचा वापर

इको मोडचे डिझाइन फक्त एनर्जी सेविंगसाठी केले गेले आहे. जर तुमच्या वॉशिग मशीनमध्ये इको मोड असेल तर कपडे धुताना त्या मोडचा वापर करावा. यामुळे वीजेची बचत होऊन बील कमी येईल.

  • पाण्याचा योग्य वापर

वॉशिंग मशीनमध्ये जास्त पाणी वापरल्यास खूप वीज जास्त वाया जाते तर खूप कमी पाणी वापरल्याने कपडे स्वच्छ धुतल्या जात नाही. ज्या वॉशिंग मशीनमध्ये कपडे पूर्णपणे बुडलेले असतील त्या मशीनमध्ये पुरेसे पाणी घेतले पाहिजे. यामुळे वीजेची बचत होऊन बील कमी येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT