Happy Couple: नातं मजबूत करण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत वाढवा भावनिक जवळीक; कामी येतील 'या' टिप्स

भावनिक जवळीक वाढवण्यासाठी नात्यात विश्वास आणि प्रेम असणे गरजेचे आहे.
Happy Couple
Happy CoupleRelationship Tips
Published on
Updated on

Happy Couple: कोणत्याही नात्यात भावनिक जवळीक असणे देखील खुप गरजेचे आहे. त्यामुळेच नात्यात गोडवा वाढतो.जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

जसे शारिरक जवळीक नवरा-बायकोच्या नात घट्ट करते तसेच बावनिक जवळीक देखील महत्वाची आहे. सध्याच्या धावपळीमध्ये एकमेकांना वेळ देऊ शकत नसल्याने दोघांमध्ये अंतर वाढत आहे. यांंमुळे नात्यात विश्वास, प्रेम असणे गरजेचे आहे. तसेच भावनिक जवळीक असणे आवश्यक आहे. यासाटी काय करावे हे जाणून घेऊया.

1) प्रामाणिक राहावे

नातं टिकून राहण्यासाठी आणि भावनिक जवळीक वाढवण्यासाठी जोडीदाराशी प्रामाणिक राहावे. तुम्ही कोणतेही काम करताना जोडीदाराला त्याची माहिती द्यावी. यामुळे दोघांमध्ये भावनिक जवळीक वाढते.

2) माफ करावे

जोडीदाराची कोणतेही चुक झाल्यास तो चुक मान्य करत असेल तर माफ करावे. यामुळे नात्यात जवळीक वाढते.

3) मनमोकळे बोलावे

नातं टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांशी मनमोकळेपणामे बोलणे गरजेचे असते. ऑफिसमधून आल्यावर एकमेकांसोबत गोष्टी शेअर कराव्या. यामुळे दोघांमध्ये भावनिक जवळिक वाढते.

Happy Couple
Tips for Relationship: जोडीदाराला इतरांसमोर चुकूनही बोलू नका 'या' गोष्टी

4) स्तुती करावे

जोडीदाराची अधुमधुन स्तुती करावी. स्तुती केल्याने भावनिक जवळीक वाढण्यास मदत मिळते. कोणतेही छोटे किंवा मोठे काम केल्यास प्राणाणिकपणे स्तुती करावी.

5) सोबत फिरायल जावे

रोजच्या धावपळीत एकमेकांना वेळ देण्यासाठी एकत्र रोमॅटिक ठिकाणी फिरायला जावे. यामुळे भावनिक जवळीक वाढेल तसेच नातं देखील घट्ट होईल.

6) संध्याकाळी सोबत जेवण करावे

असे बोलतात की सोबत जेवण केल्याने प्रेम वाढते. सकाळी ऑफिसला जायची घाई असल्याने सोबत जेवण होत नसेल तर संध्याकाळी दोगांनी सोबत जेवण करावे. यामुळे भावनिक जवळीक वाढते.

7) आजारी असताना कामात मदत करावी

एखाद्या वेळी आजारी असल्यास जोडीदाराला कामात मदत करावी. यामुळे नात्यातील प्रेम तर वाढेलच तसेच बावनिक जवळीक देखील वाढेल.

8) आदर करावा

नातं टिकून ठेवण्यासाठी आपल्या जोडीदराचा आदर करावा. त्याच्या मताला किंवा निर्णयाचा आदर करावा. तुम्ही सहमत नसाल तर शांतपणे तसे सांगावे. यामुळे देखील भावनिक जवळीक वाढते.

9) जोडीदाराचे मत ऐकावे

भावनिक जवळीक वाढवण्यासाठी जोडीदाराचे म्हणणे शांतपणे एकावे. यामुळे नातं देखील टिकून राहण्यास मदत मिळते.

Happy Couple
Relationship Tips: मोबाईलचा पासवर्ड बदलणं, इग्नोर करणं ... 'ही' 5 लक्षणं सांगतात तुमचा पार्टनर तुम्हाला लवकरच करेल टाटा-बाय

10) आवडी-निवडी जपावे

प्रत्येकाच्या आवडी-निवडी या वेगवेगळ्या असतात. यामुळे आपल्या जोडीदाराला काय आवडते काय नाही आवडत याकडे लक्ष द्यावे. यामुळे भावनिक जवळीक वाढते.

11) कठिण परिस्थितीत साथ द्यावी

नात्यातील गोडवा आणि भावनिक जवळीक वाढवण्यासाठी एकमेकांना सुख-दुखात साथ द्यावी. कोणतेही समस्या आल्यास खंबीरपणे जोडीदाराच्या पाठिशी उभे राहावे.

12) एकमेकांची काळजी घ्यावी

भावनिक जवळीक वाढवण्यासाठी एकमेकांची काळजी घ्यावी. आपल्या जोडीदाराला काय पाहिजे आहे का? कोणत्या गोष्टीची अडचण नाही ना? यासरखे प्रश्न विचारावे. यामुळे नातं अदिक घट्ट होते आणि भावनिक जवळीक देखील वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com