Good Habits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Good Habits: शरीरात व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण वाढवायचे असेल तर करू नका 'या' चुका

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर डोळे, मेंदु आणि इतर अवयव खराब होऊ शकतात.

Puja Bonkile

Good Habitsछ शरीर निरोगी आणि फिट राहण्यासाठी अनेक व्हिटॅमिनची आवश्यकता असते. यामध्ये व्हिटॅमिन बी १२ खुप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता असेल तर अनेक शारिरिक आजार उद्भवतात. यामुळे तुमच्या दिनचर्येतील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

बद्धकोष्ठता

शरीरात व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण वाढवण्यासाठी पोट साफ असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे चुकूनही पोटासंबंधित आजार निर्माण होऊ देऊ नका. पोट साफ राहण्यासाठी नेहमी पुरेसे पाणी प्यावे आणि व्यायमाकडे लक्ष द्यावे.

कंदमुळ

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कंदमुळाचा समावेश करावा. यामुध्ये मुळा, गाजर, बीट, यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. जमिनीत उगवणाऱ्या या भाज्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. तुम्ही ही कंदमुळ सलादमध्ये किंवा तसेच कच्चे देखील खाऊ शकता.

फळं आणि भाज्या

तुमच्या आहारात नियमितपणे फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. त्यात फायबर असते जे प्री-बायोटिक म्हणून काम करते. प्री-बायोटिक्स हे निरोगी आतड्यांतील बॅक्टेरियासाठी पोषण आणि अन्नासारखे असतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढू लागते.

आंबवलेले अन्न

लोणचे आणि सॉकरक्रॉट सारख्या आंबलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. हे प्रोबायोटिक्स लहान जीव आहेत. जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आंबलेल्या अन्नामध्ये असे अनेक प्रकारचे जीव असतात.

टाईमटेबल बनवावा

तुमच्या झोपण्याच्या, उठण्याच्या आणि खाण्याच्या वेळ निश्चित कराव्या. कारण ही दिनचर्या तुमच्या पचनावर परिणाम करते. ज्यामुळे तुम्हाला अन्नातून व्हिटॅमिन बी12 सहज मिळू शकते आणि पोट आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT