Vitamin B12 and Depression Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin B12 and Depression: डिप्रेशनवर मात करण्यासाठी मदत करेल 'व्हिटॅमिन बी12'; जाणून घ्या कसं मिळवाल

शरिरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Puja Bonkile

Vitamin B12 and Depression: शरिरामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

एका अभ्यासामध्ये असे दिसून आले की ज्या लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता आहे त्यांना डिप्रेशन, अशक्तपणा, कमजोर हाडे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले होते.

पण तुम्हाला माहिती आहे का हे व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारे असून संपुर्ण शरिरात पसरते. हे व्हिटॅमिन शरीरात ४ वर्षांपर्यंत साठवून ठेवता येते.

ज्या लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता जाणवते तेव्हा डॉक्टर व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट्स लिहून देतात. चला तर मग जाणून घेऊया या व्हिटॅमिनचे फायदे कोणते आहेत.

  • डिप्रेशनक कमी होते

B12 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लोकांना डिप्रेशनला सामोरे जावे लागते. या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर व्हिटॅमिन बी 12 सप्लिमेंट्सचा वापर करावा.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असलेल्या आणि मुड डिसऑर्डर आणि डिप्रेशन ग्रस्त असलेल्या लोकांच्या बाबतीत बी 12 चे फायदे सांगितले आहेत.

  • मॅक्युलर डिजनरेशन

B12 व्हिटॅमिनचा वापर केल्याने 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये मॅक्लुलर डिजनरेशनची समस्या कमी जाणवते.

तसेच एका अभ्यासानुसार असे दिसून आले की डोळ्यांचे आजार देखील B12 व्हिटॅमिनचे योग्य प्रमाण असेल तर कमी होते.

  • हाडांचे आरोग्य

B12 व्हिटॅमिनचे शरिरात पुरेश्या प्रमाणात असल्यास हाडे मजबुत राहतात.अभ्यासात असे दिसून आले की ज्या लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता होती त्यांच्यामध्ये हाडांचे आरोग्य सामान्यपेक्षा कमकुवत होते.

पोषक घटकांच्या कमतरतेमुळे हाडे ठिसुळ होऊ शकतात. यामुळे आहारात मासे, अंडी या पदार्थांचा समावेश करावा.

  • गर्भधारणेसाठी गरजेचे

महिलांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता अधिक जाणवते. यामुळे महिलांनी पोषक आहार घेण्यावर भर द्यावा.

अभ्यासामध्ये असे दिसून आले की गर्भाच्या विकासासाठी आणि आईच्या आरोग्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन असणे गरजेचे आहे. अन्यथा गर्भपात किंवा बाळाचा जन्म लवकर होऊ शकतो.

  • अशक्तपणा

ज्या लोकांमध्ये बी १२व्हिटॅमिन भरपुर असते त्या लोकांना अशक्तपणा जाणवत नाही. संशोधनानुसार ज्या लोकांमध्ये या व्हिटॅमिनचे पुरेसे प्रमाण आहे त्यांना थकवा किंवा अशक्तपणा जास्त जाणवत नाही.

यामुळे शरिरात या व्हिटॅमिनचे पुरेसे प्रमाण असणे गरजेचे आहे. यासाठी सुकामेवा, मासे, अंडी या पदार्थांचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT