Lyme Disease: सुपर मॉडेल बेला हदीदला असलेला 'लाइम आजार' काय आहे? ही आहेत गंभीर लक्षणे

डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा, ताप आणि टिक चावल्यावर त्वचेवर पुरळ देखील येऊ शकते. तुम्हाला ही लक्षण आढळल्यास लगेच तज्ञांशी संपर्क साधावा.
Lyme Disease
Lyme DiseaseDainik Gomantak
Published on
Updated on

Lyme Disease: अमेरिकन सुपरमॉडेल बेला हदीद गेल्या 15 वर्षांपासून लाइन या गंभीर आजाराला झुंज देत आहे. या आजाराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा एक प्रकारचा गंभीर आणि जीवघेणा आजार आहे जो एक किटक चावल्याने होतो.

या किटकाचे नाव टिक्स आहे. त्याची लक्षणे जरी खूप सामान्य आहेत. परंतु काहीवेळा ते जीवघेणे ठरू शकतात. उदाहरणार्थ, डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा, ताप आणि टिक चावल्यावर त्वचेवर पुरळ देखील येऊ शकते. तुम्हाला ही लक्षण आढळल्यास लगेच तज्ञांशी संपर्क साधावा.

  • लाइम आजाराचे लक्षण कोणती?

  1. थकवा येणे

  2. ताप येणे

  3. डोक दुखणे

  4. सांधे दुखणे

यासारखी वरील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. हा टिक किडा जंगलामध्ये आढळतो. यामुळे तुम्ही जर भटकंती करायला जात असाल तर स्वत:ची काळजी घ्यावी.

  • लाइम आजाराचे कारण

युनायटेड स्टेट्समधील सर्वात सामान्य टिक हा किटक चावल्याने लाइम आजार होतो. देशाच्या काही भागांमध्ये आढळणाऱ्या बोरेलिया बर्गडोर्फेरी या प्रजातीच्या टिक्समधील बॅक्टेरियामुळे हा आजार होतो.

जेव्हा संक्रमित टिक एखाद्या व्यक्तीला चावतो तेव्हा ते बॅक्टेरिया रक्तप्रवाहात पसरते. नंतर बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करते आणि चाव्याच्या जागेभोवती थकवा, ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि पुरळ यांसह अनेक लक्षणे दिसू लागतात.

Lyme Disease
Beauty Tips: 'हे' 5 पदार्थ आहेत व्हिटॅमिन ई कॅप्सूलसाठी सर्वोत्तम पर्याय

यामुळे लाइम आजार हा संधिवाताचे कारण बनू शकते. यासोबतच यामुळे हृदयाशी संबंधित आजार आणि अनेक दीर्घ आणि गंभीर आजारही होऊ शकतात. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या शरीरात अशी काही लक्षणे दिसत असतील, तर ती लाइम रोगाशी संबंधित असू शकते. त्वरित तपासणी करून तज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल बेला हदीद (Bella Hadid) गेल्या 15 वर्षांपासून लाइम आजाराशी झुंज देत आहे. या लांबच्या प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता ती या आजाराला बळी पडलेल्या इतर लोकांना मदत करत आहे. त्याचबरोबर लोकांना याची जाणीव करून देण्याचे काम ती करत आहे.

दीर्घ आजाराने त्रस्त असलेले लोकही पूर्ण आणि यशस्वी आयुष्य कसे जगू शकतात याचे हदीद हे एक उत्तम उदाहरण आहे. तिची आशा आहे की तिची गोष्ट इतरांना या आजाराबद्दल सतर्क राहण्यासाठी मदत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com