Video Banking Service: बँक खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा माहितीसाठी तुम्ही कस्टमर केअरला कॉल करता.
पण आता एका बँकेने ग्राहकांना व्हिडिओ कॉलची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या समस्या बँकरला व्हिडिओ कॉल करू सांगू शकता.
ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी AU स्मॉल फायनान्स बँकेने व्हिडिओ कॉल सुविधा सुरू केली आहे.
तसेच ग्राहकांना 24X7 व्हिडिओ बँकिंग सुविधा देणारी ही पहिली बँक असल्याचा दावा AU स्मॉल फायनान्स बँकेने केला आहे.
जनधन खाते असणारे लोक देखील घेऊ शकतात फायदा
एयू स्मॉल फायनान्सचे कार्यकारी संचालक उत्तम टिबरेवाल यांच्या म्हणण्यानुसार, 'ही सुविधा बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, बँकिंगसंबंधित कोणतेही काम असले तरी व्हिडिओ बँकिंगद्वारे करता येईल.
तसेच टिबरेवाल यांनी सांगितले की AU SFB चे पंतप्रधान जन धन खातेधारक देखील व्हिडिओ बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात.
AU स्मॉल फायनान्स बँकेची समर्पित टीम सुट्ट्या आणि शनिवार व रविवारच्या दिवशीही सेवेत असणार आहे. सर्व व्हिडिओ बँकर्स ऑन-रोल कर्मचारी आहेत.
व्हिडिओ बँकिंग सेवा 365 दिवसांसाठी 24x7 उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, व्हिडीओ कॉलिंगची ही सुविधा रविवारी सकाळी 1 वाजताही सुरू होणार आहे. AU SFB नियामकांनी जारी केलेल्या डेटा सुरक्षा तत्त्वांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते.
व्हिडिओ बँकिंगमध्ये 400 हून अधिक सेवांचा घेऊ शकता लाभ
AU SFB ने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये असे म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक 24x7 व्हिडिओ बँकिंग सेवेद्वारे 400 हून अधिक सेवांचा लाभ घेऊ शकतात.
बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या सुविधांमध्ये पत्ता अपडेट करणे, कर्जाची चौकशी, क्रेडिट कार्ड केवायसी, एफडी, फास्टॅग रिचार्ज, चेक बुकसाठी रिक्वेस्ट आणि इतर सुविधांचा समावेश आहे.
या सर्व सुविधांशिवाय सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत व्हिडीओ बँकिंग वापरून सेव्हिंग अकाउंट उघडता येते तसेच त्याचे केवायसी पूर्ण करता येते.
टिब्रेवाल पुढे म्हणाले की, व्हिडिओ बँकिंगद्वारे काही बँकिंग ट्र्रांजेक्शन करणे शक्य नाही. म्हणजेच, रोख संबंधित व्यवहार, धनादेश जमा करणे आणि रात्री 8 ते सकाळी 8 दरम्यान सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार याद्वारे शक्य नाहीत.
NEFT, IMPS आणि इतर सर्व प्रकारचे फाइनेंशियल ट्रांजेक्शन फक्त सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत व्हिडिओ बँकिंगद्वारे करता येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.