Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

कच्च्या तेलाच्या दरांनुसार तेलकंपन्या ठरवतात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती
Goa Petrol Diesel Price 10th August 2023:
Goa Petrol Diesel Price 10th August 2023: Dainik Gomantak

Goa Petrol Diesel Price 10th August 2023: गुरूवारी १० ऑगस्ट रोजी गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये बदल झाले. उत्तर गोवा, पणजी आणि दक्षिण गोवा अशा तिन्ही ठिकाणी हे बदल झाले. यामध्ये उत्तर गोवा आण पणजीतील दरांमध्ये किंचित वाढ तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये किंचित घट झाली.

उत्तर गोव्यातील पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.06 पैशांची वाढ झाली. राजधानी पणजीत प्रतीलीटर 0.18 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरांत प्रतीलीटर - 0.34 पैशांची घट झाली. डीझेल दरांमध्येही उत्तर गोव्यात प्रतीलीटर 0.05 पैशांची वाढ झाली, तर पणजीत प्रतीलीटर +0.18 पैशांची वाढ झाली आणि दक्षिण गोव्यातील डीझेल दर प्रतीलीटर - 0.32 पैशांनी घटले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

Goa Petrol Diesel Price 10th August 2023:
BCCI's Income Tax: बाबो! BCCI ने एका वर्षात भरला कोट्यवधींचा टॅक्स, आकडा ऐकून जाल चक्रावून

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.90 (+ 0.06)

Panjim ₹ 98.08 (+ 0.18)

South Goa ₹ 97.41 (- 0.34)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62 (+ 0.05)

Panjim ₹ 90.62 (+ 0.18)

South Goa ₹ 89.68 (- 0.32)

Goa Petrol Diesel Price 10th August 2023:
WhatsApp New Feature: व्हिडिओ कॉलिंगची मजा होईल द्विगुणित, व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले दमदार फिचर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com