Winter Vegetable Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Vegetable: हिवाळ्यात गोव्यात मिळणाऱ्या भाज्या आणि त्यांचे महत्व वाचा

Winter Vegetable Goa: फरसबी, गवार, अळसांदे, घेवडा, हिरवे वाटाणे, चवळी आदी शेंगांचा वापर स्थानिक पातळीवर भाजी म्हणून केला जातो. यापैकी काहींच्या वाळलेल्या बियां डाळी किंवा कडधान्य म्हणून वापरल्या जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

मिंगेल ब्रागांझा

हा डिसेंबर महिना आहे आणि गोव्याचा पर्यटन हंगाम शिगेला पोहोचला आहे. नववर्षाच्या उत्साही प्रतीक्षेची भरही त्यात आहेच. स्थानिक शेतकरी मात्र या काळात या मोसमातील रब्बी पिकांच्या उत्पादनांमध्ये व्यस्त आहेत. 

फरसबी, गवार, अळसांदे, घेवडा, हिरवे वाटाणे,  चवळी आदी शेंगांचा वापर स्थानिक पातळीवर भाजी म्हणून केला जातो. यापैकी काहींच्या वाळलेल्या बियां डाळी किंवा कडधान्य म्हणून वापरल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे या डाळींमध्ये सुमारे १८ टक्के प्रथिने असतात. भारतात शाकाहारी लोक या शेंगा किंवा कडधान्ये प्रथिनांचा स्रोत म्हणून अन्नात वापरतात. ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशराज मधील मांसाहारामधून प्रथिने मिळवणाऱ्या लोकांनी या खाद्याला काव-पी, चीक-पी, पिजन-पी, हॉर्स-ग्राम अशी नावे दिली जी त्यांच्या 'बीन्स'सारख्या वनस्पतीच्या कुटुंबातील होती.

शेंगा नायट्रोजनचे प्रमाण राखणाऱ्या बॅक्टेरियाशी संबंध राखतात आणि त्या अविभाजित वनस्पती कुटुंब 'लेग्युमिनोस'शी संबंधित आहेत. पण आता वनस्पती वर्गीकरणाच्या नवीन नियमानुसार हे कुटुंब आता चार स्वतंत्र कुटुंबांमध्ये पुढीलप्रमाणे विभागले गेले आहे- फेबेसी, मिमोसेसी, पॅपिलोनासी आणि सिसाल्पिनियासी.

१९६० दशकाच्या मध्यापासून स्थानिक शेतात युरियाचा वापर सुरू झाला आणि त्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होत गेली. त्यामुळे १९८० या दशकापासून शेतात रायझोबियम कल्चरसह बीज प्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात आली होती. (रायझोबियम कल्चर बीज प्रक्रिया ही मातीची सुपीकता सुधारण्यासाठी रायझोबियम जिवाणू असलेलाद्रव किंवा पावडर वापरून बियाण्यांवर लेप करण्याची प्रक्रिया आहे.) परंतु वाढत्या संख्येने नैसर्गिक आणि सेंद्रिय‌ शेती पद्धतीकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांमुळे ते आता आवश्यक राहिलेले नाही.

खरीप किंवा पावसाळ्यातील पिकांची कापणी झाल्यानंतर भाताच्या पडीत पारंपरिकपणे चवळी किंवा अळसांद्याचे पीक घेण्याचे अनेक फायदे आहेत. फक्त एका नांगरणीनंतर चवळी किंवा अळसांदे सर्व शेतात पसरून टाकल्या जातात.‌ त्यामुळे माती नायट्रोजन युक्त होऊन समृद्ध बनते आणि पावसाळ्यातील तणांच्या वाढीस प्रतिबंध करते. या पिकातील शेंगा भाजी म्हणून, त्यातील बिया कडधान्य म्हणून आणि  वनस्पती पौष्टिक पशुखाद्य म्हणून वापरले जाते. या पिकांमुळे शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळतेच परंतु त्याशिवाय चारा, खत आणि तण यावरील नियंत्रण खर्चातही बचत होते. चारा आणि मका यात‌ आंतरपीक म्हणून शेंगयुक्त धान्याची शिफारस केली जाते. 

आपल्या घरगुती बागेत आणि शेतातील पिकांमध्ये कडधान्यांचा समावेश करणे नेहमीच चांगले असते.  गवार, चवळी आणि अळसांदे घरगुती जागेमध्येही वाढू शकतात. त्यांना जेव्हा फुले येतात तेव्हा ती विशिष्ट कीटकांना (aphids) आकर्षित करतात. गवार तर त्यांच्या विशेष आवडीची असते. या समस्येचा सामना करण्यासाठी ब्युव्हेरिया

बासीयांना सस्पेन्शन १० मिली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संपूर्ण हंगामासाठी एक फवारा पुरेसा आहे.

मिरची, शिमला मिरची, टोमॅटो, चेरी टोमॅटो आणि वांगी ही पिके वर्षाच्या या काळात चांगली वाढतात. नवलकोल देखील या काळात चांगला वाढतो. त्याच्या बिया ट्रेमध्ये किंवा उंचावलेल्या मातीत पेरल्या गेल्या पाहिजेत आणि त्याला ४ ते ६ पाने आल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे. मात्र यंदाचे हवामान अंदाज करण्यायोग्य नसल्यामुळे कोबी, फ्लॉवर किंवा ब्रोकोली पेरणे जोखमीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT