Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Goa Rain: हवामान विभागाने 6 वाजता हवामानाचा 'नाऊकास्ट' (NOWCAST) इशारा जारी केला. हा इशारा पुढील तीन तासांसाठी म्हणजेच रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काणकोणात सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. संपूर्ण शहरात मुसळधार सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. यातच आता, हवामान विभागाने 6 वाजता हवामानाचा 'नाऊकास्ट' (NOWCAST) इशारा जारी केला. हा इशारा पुढील तीन तासांसाठी म्हणजेच रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर गोव्यातील काही ठिकाणी पुढील 3 तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार आहे. सध्या डिचोलीमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून ढग नैऋत्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या 3 तासात उत्तर गोव्यातील काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी बरसू शकतात.

Goa Weather Update
Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात अवकाळी पावसाचा इशारा आल्याने नागरिकांनी तातडीने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विजांचा कडकडाट सुरु असताना लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. सुरक्षित ठिकाणी थांबावे. तसेच उंच झाडे, विजेचे खांब किंवा पाण्याजवळ उभे राहणे पूर्णपणे टाळावे. याशिवाय, शेतीत असलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि शेतातील कामे थांबवावीत. हा 'नाऊकास्ट' इशारा तात्काळ परिस्थिती लक्षात घेऊन जारी करण्यात आल्यामुळे उत्तर गोव्यातील नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com