PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

PM Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात लगबग सुरू आहे.
PM Modi Goa tour
PM Modi Goa tourDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात लगबग सुरू आहे. दि. २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात उंच, ७७ फूट उंचीच्या, भगवान श्रीरामाच्या भव्य कांस्य मूर्तीचेअनावरण होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी काणकोणमध्ये तीन नवीन हेलिपॅडचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्रशासनाने तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.

श्रीराम मूर्तीचे ८५ टक्के काम पूर्ण

पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हा सोहळा अत्यंत भव्य असणार आहे. मठात उभारण्यात येणारी ७७ फूट उंचीची ही कांस्य मूर्ती देशातील सर्वात उंच श्रीराम मूर्तींपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मूर्तीचे सुमारे ८५ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम अनावरणापूर्वी वेळेत पूर्ण होईल.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी 'थ्री-इन-वन' हेलिपॅड

पंतप्रधान मोदींच्या हवाई प्रवासासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने काणकोणमध्ये तीन हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे हवाई मार्गे मठापर्यंत प्रवास करणार असून, या नवीन सुविधांचा वापर त्यांच्या वाहतुकीसाठी केला जाईल.

PM Modi Goa tour
Modi Goa Visit: गोव्यात उभारते आहे 77 फूट उंच 'श्रीराम मूर्ती'! PM मोदींच्‍या हस्ते होणार अनावरण; पर्तगाळ मठात येणार हजारो भाविक

धार्मिक विधी आणि सार्वजनिक कार्यक्रम

मूर्तीच्या अनावरणाव्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी मठाच्या वर्धापनदिन सोहळ्यातही सहभागी होणार आहेत. मोदी धार्मिक विधींमध्ये भाग घेतील, तसेच मोठ्या जनसमुदायाला संबोधित करतील. या सार्वजनिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे गोव्यातील या ऐतिहासिक धार्मिक स्थळाला राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com