Tulsi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: तुळशीजवळ कोणता शाळीग्राम ठेवणे मानले जाते शुभ, वाचा एका क्लिकवर

घरात तुळशी ठेवण्यासोबतच शाळीग्रामची स्थापनाही करणे देखील शुभ मानले जाते.

Puja Bonkile

Vastu Tips: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खुप महत्व आहे. प्रत्येक घरात तुळशीची पुजा करण्याची परंपरा आहे. घरात तुळशी ठेवण्यासोबतच शाळीग्रामची स्थापनाही करावी असे सांगितले जाते. 

शाळीग्रामची पूजा केल्याशिवाय तुळशीची पूजा पूर्ण होत नाही असे मानतात. तुळशीच्या रोपामध्ये शाळीग्रामची स्थापना करण्याची पद्धत आहे. पण कोणता शाळीग्राम बसवावा हे बहुतेकांना माहीत नाही. शाळीग्रामचे किती प्रकार आहेत आणि कोणते ठेवावे हे जाणून घेऊया.  

हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकूण 33 प्रकारच्या शाळीग्रामांचा उल्लेख आहे. या 33 प्रकारच्या शाळीग्रामांपैकी 24 प्रकारचे शाळीग्राम हे भगवान विष्णूचे 24 अवतार, शैव संस्कृतीत या शाळीग्रामांना भगवान शंकराचे जागृत रूप म्हटले जाते. 

असे मानले जाते की सर्व शाळीग्राम घरात ठेवता येत नाहीत. घरी बसवल्या जाणाऱ्या शाळीग्राममध्ये मत्स्य शालिग्राम, नारायण शालिग्राम, गोपाल शालिग्राम, सुदर्शन शालिग्राम, सूर्य शाळीग्राम आणि वामन शाळीग्राम यांचा समावेश होतो.

त्याच वेळी, ज्या शाळीग्रामांची स्थापना फक्त मंदिरातच केली जाते त्यात हे समाविष्ट आहेत: जनार्दन शालिग्राम, नरसिंह शालिग्राम, वराह शालिग्राम आणि सुदर्शन शालिग्राम. हे शालिग्राम घरामध्ये ठेवले जात नाहीत कारण त्यांचे नियम कठीण आहेत.  

तुळशीमध्ये शाळीग्रामची स्थापना करताना तो नारायण शाळीग्राम ठेवावा. म्हणजे तुळशीजवळ फक्त नारायण शाळीग्राम ठेवावा. कारण असे करणे शुभ मानले जाते.

तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि अशा नारायण शाळीग्राम तुळशीजवळ बसणे शुभ असते. तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यानंतर त्याची नित्य पूजा करावी आणि रोज चंदन लावावे, हे नेहमी लक्षात ठेवावे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT