Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: TV पाहताना ‘या’ दिशेला असावे तोंड, वाचा एका क्लिकवर

Vastu Tips For TV: घराची वास्तू बरोबर नसेल तर घरात नकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष निर्माण होतो.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) खूप महत्त्व दिले जाते. आजच्या आधुनिक युगातही लोक घर बांधताना वास्तूचे सर्व नियम पाळतात. घराची वास्तू बरोबर नसेल तर घरात नकारात्मकता वाढते आणि वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. घरामध्ये असलेल्या वस्तूंपासून ते खिडकी, स्वयंपाकघर, स्नानगृह, अगदी घरातील वनस्पती देखील योग्य दिशेने असणे खूप महत्वाचे आहे. तसेच टीव्ही ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे हे जाणून घेउया.

टीव्ही लावण्यासाठी योग्य दिशा

वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याची दिशा सांगितली आहे.टीव्ही ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा निश्चित करण्यात आली आहे. टीव्ही दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते आणि टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दक्षिण दिशेला असावा असे सांगण्यात आले आहे. यामुळे लिविंग रूममध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

इथे टीव्ही ठेवू नका

वास्तुशास्त्रात बेडरूममध्ये टीव्ही (TV) लावू नये असे सांगण्यात आले आहे. अनेकांना रात्री झोपताना टीव्ही पाहणे आवडते, त्यामुळे ते त्यांच्या बेडरूममध्ये टीव्ही लावतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. असे केल्याने झोपेवर परिणाम तर होतोच, पण वास्तुशास्त्रातही हे अशुभ मानले गेले आहे.

हे लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार टीव्ही अशा ठिकाणी ठेवू नये, जेथून घरात प्रवेश करताना समोर दिसत असेल, हे वास्तूनुसार शुभ मानले जात नाही. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT