Samudrika Shastra: व्यक्तिच्या नाकाच्या आकारावरून जाणून घेऊ शकता स्वभाव

Lifestyle News: समुद्र शास्त्रानुसार तळहाताच्या रेषांव्यतिरिक्त व्यक्तीची देहबोली, वागणूक आणि स्वभावही जाणून घेता येतो.
Samudrika Shastra:
Samudrika Shastra:Dainik Gomantak

समुद्र शास्त्रानुसार (Samudrika Shastra) तळहाताच्या रेषांव्यतिरिक्त व्यक्तीची देहबोली, वागणूक आणि स्वभावही जाणून घेता येतो. सामुद्रिक शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीचे शारीरिक स्वरूप आणि भाग त्याचे गुण, स्वभाव आणि नशीब दर्शवतात. आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये नाक महत्त्वाचे मानले जाते. नाकावरून व्यक्तीचा स्वबाव ओळखता येतो.

नाकावरून कसे ओळखावे स्वभाव

  • समुद्रशास्त्रानुसार (Samudrika Shastra) जर एखाद्याचे नाक सरळ असेल तर तो साधा स्वभावाचा (Nature) असतो. असे लोक आपला मुद्दा सहजासहजी कोणाला सांगत नाही. हे लोक संयमाने पुढे जातात. या लोकांच्या मनात मनातील गोष्टी लवकर समजणे कठीण असते. या लोक आपल्या आयुष्यात फार गोंधळलेले असतात.

  • सपाट नाक असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व मन अस्थिर असते.त्यांचा स्वभाव परिस्थितीवर अवलंबून असतो. असे लोक कोणत्याही निर्णयात घाई करत नाहीत. असे लोक खूप आकर्षक असले तरी त्यांच्यामुळे लोक प्रभावित होतात.

Samudrika Shastra:
E-Cigarette म्हणजे काय? सततच्या वापराने होऊ शकतो या अवयवांवर परिणाम
Nose
NoseDainik Gomantak
  • पोपटासारखे आणि टोकदार नाक असणारे लोक खूप हुशार असतात. अशा व्यक्तीच्या नाकावर राग राहतो. असे लोक मनाने शुद्ध असले तरी यश (Success) मिळविण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.

  • फुगीर आणि वाढलेले नाक असलेले लोक खूप चपळ असतात. असे लोक प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात. मात्र, कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी असे लोक नीट विचार करतात.

  • लहान नाक (Nose) असलेले लोक प्रेमळ लोक असतात. असे लोक कोणतीही चिंता न करता आयुष्य जगतात. मात्र, असे लोक इतरांच्या डोळ्यात अंजन घालतात. असे लोक विनाकारण दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com