Vastu Tips For Travel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Vastu Tips: चुकीच्या दिशेला कागदपत्रे ठेवताय...? तुमच्या फॉरेन ट्रीपचं स्वप्न लांबणीवर पडू शकतं

तुम्हालाही फॉरेन ट्रिपला जायचे असेल तर तुम्ही या वास्तु टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Vastu Tips For Traveling Abroad: फॉरेन ट्रिपला जाण्याचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आहेत. कधी शिक्षणासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी फॉरेनला जायचे असते. यासाठी पुर्ण तयारी करतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की त्यांचे स्वप्न पुर्ण होईल, तेव्हा कुठल्या ना कुठल्या समस्या निर्माण होतात.

अशावेळी प्रॉब्लेम कुठे होतोय हेच समजत नाही. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण काही वेळा तुमच्या काही वास्तुच्या चुकाही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा अनेक वास्तू चुका आहेत ज्या तुमच्या फॉरेन ट्रिपमध्ये अडथळे निर्माण करू शकतात. चला तर मग जाणून गेऊया कोणच्या चुका टाळल्या पाहिजेत.

चुकीच्या ठिकाणी कागदपत्रे ठेवणे

अनेक वेळा आपण फॉरेनला जाण्याशी संबंधित कागदपत्रे जसे की महत्त्वाची सर्टिफिकेट, व्हिसा किंवा डॉक्युमेंट यासारखे कागदपत्रे कुठेतरी ठेवतो. पण प्रत्यक्षात असे केल्याने तुम्ही फॉरेन ट्रिपला जावू शकणार नाही. विशेषत: जर तुम्ही डॉक्युमेंट दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवत असाल तर तुमची फॉरेन ट्रिप लांबणीवर पडू शकते.

कागद कुठेही ठेऊन विसरून जाणे

अनेकवेळा असे घडते की आपण आपल्या फॉरेन ट्रिपला जाण्यासंबंधीची कागदपत्रे एका ठिकाणी ठेवतो आणि गरज पडेपर्यंत ते पाहत नाही. तर असे करू नका. असे केले तर फॉरेनला ट्रिपला जाणे कठीण होऊन बसतं. त्यामुळे 10-15 दिवसांतून एकदा ते पेपर काढून पाहावे.

फॉरेन करंन्सी कुठे ठेवावी

अनेक वेळा असे घडते की आपण ज्या देशात जात आहोत त्या देशाचे चलन आपण आधीच काढून जवळ ठेवतो. पण तुम्हीही असेच करत असाल तर ते नैऋत्य दिशेला ठेवण्याची चूक कधीही करू नका.

विविध कागदपत्रेसोबत ठेवणे

अनेकांना सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी ठेवण्याची सवय असते. पण जर तुम्हाला शक्य तितक्या लवकर फॉरेन ट्रिपला जायचे असेल, तर तुमच्या फॉरेन ट्रिप संबंधित कागदपत्रांसह इतर कोणत्याही कागदपत्रासोबत ठेऊ नका. यामुळे कागदपत्रे नीट जागी ठेवावी.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT