Vastu Tips Happiness Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips Happiness: 'या' 5 गोष्टी चुकूनही ठेऊ नका उघड्या, अन्यथा भासेल आर्थिक चणचण

वास्तुनुसार घरातील काही गोष्टी उघड्या ठेवल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागु शकते.

Puja Bonkile

Vastu Tips Happiness: वास्तुशास्त्रानुसार नियमांचे पालन केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. पण याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लोक अनेक वस्तु नकळतपणे उघड्या ठेवतात. असे करणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या उघड्या ठेवल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

मीठ

वास्तुनुसार मीठ चंद्राशी संबंधित आहे. सोमवारी मीठ दान केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो. वास्तुनुसार मीठ कधीही उघडे ठेऊ नका. कारण यामुळे कुंडलीत चंद्र कमजोर होऊ शकतो. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पुस्तक

वास्तुशास्त्रानुसार पुस्तक हे बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध, ग्रहांचा राजकुमार, मन, बुद्धी आणि वाणीसाठी जबाबदार आहे. त्यामुळे तुम्ही जर पुस्तक वाचत नसाल तर ते कधीही उघडे ठेवू नका. असे केल्याने कुंडलीत बुध ग्रह कमजोर होतो. त्यामुळे पुस्तक उघडे ठेवू नये.

जेवण

वास्तुनुसार जेवण कधीही उघडे ठेवू नये. कारण असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो. त्यामुळे घरात अन्नधान्य आणि पैशाची चणचण निर्माण होऊ शकते. तसेच जेवण उघडे ठेवल्यास अन्न दूषित होऊ शकते. यामुळे तुम्हाला पोटासंबंधित आजार होऊ शकतात.

दुध

दूध आणि दही दान केल्याने कुंडलीतील शुक्र आणि चंद्र बलवान होतात. म्हणून सोमवार आणि शुक्रवारी दूध आणि दही दान करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर दूध आणि दही उघडे ठेवल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर होतो. तसेच याचा आरोग्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे चुकूनही दुध आणि दही उघडे ठेऊ नका.

कपाट

अनेक लोक घाईत असल्यावर कपडे किंवा पैसे घेतल्यावर किंवा ठेवल्यानंतर अनेकदा कपाट उघडे ठेवतात. वास्तुनुसार असे करणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तज्ज्ञांच्या मते, कपाट उघडे ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. यामुळे घरातील सुख-समृद्धी देखील कमी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT