Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात बाळासाठी रूम सजवतांना कोणती काळजी घ्यावी, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घरात एखादा छोटा पाहुणा आला की लोक त्याच्यासाठी वेगळी रूम तयार करतात. मात्र, हे करताना काही छोट्या वास्तु टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Puja Bonkile

Vastu Tips: घरात लहान पाहुणे आल्याची बातमी कळली की आनंदाचे वातावरण असते. ही बातमी आल्यापासून कुटुंबीय या चिमुकल्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. एवढेच नाही तर त्यासाठी अनेक प्रकारची तयारीही केली जाते. उदाहरणार्थ, त्याच्या आगमनापूर्वीच त्याच्या रूमची सजावट केली जाते. पण हे करत असताना पाहुण्यांसाठी रूम तयार करताना तुमच्या आवडी-निवडीची तर विशेष काळजी घेतलीच पाहिजे शिवाय वास्तुच्या काही नियमांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. 

रंगाची काळजी घ्यावी

जेव्हा तुम्ही लहान पाहुण्यांसाठी रूम तयार करता तेव्हा तुम्ही रंगांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. नवजात बाळाच्या खोलीत डार्क रंग कधीही वापरू नका. तेथे नेहमी लाइट रंग वापरावे. उदाहरणार्थ, लाइट गुलाबी, लाइट निळा किंवा लाइट हिरवा रंग या रूमसाठी सर्वोत्तम मानला जातो. येथे कधीही तपकिरी किंवा काळ्या रंगाचा शेड वापरू नका.

उत्तर-पूर्व रिकामे असावे 

नवीन पाहुण्यांच्या रूमचा उत्तर-पूर्व कोपरा रिकामा ठेवण्याचा प्रयत्न करा. येथे कधीही जड वस्तू ठेवू नका. बरेचदा असे घडते की बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक संपूर्ण रूम खेळण्यांनी भरतात. पण कोणत्याही प्रकारची खेळणी ईशान्य कोपर्‍यात ठेवणे टाळा.

बाळाचा पाळणा

जेव्हा बाळाची रूम सजवते तेव्हा तेथे पाळणा नक्कीच ठेवला जातो. जर तुम्ही तुमच्या लहान पाहुण्यांसाठी पाळणा आणला असेल तर तो पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. .

बाळाचे सामान

बाळाच्या रूममध्ये अनेक आवश्यक वस्तू आहेत. अनेक वेळा आपण याकडे लक्ष देत नाही आणि घरातील सर्व सामान विखुरले जाते. अशी चूक करू नका. बाळाचे कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी नेहमी व्यवस्थित ठेवावे. त्यांना अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा की नवजात मुलांची नजर त्यांच्यावर पडेल. ते खूप चांगले मानले जाते.

पूर्व भिंत

लहान पाहुण्यांची रूम सजवताना त्याच्या रूमच्या पूर्वेकडील भिंतीवर बाल गोपाळाचा फोटो लावावा. या दिशेला बाल गोपाळाचा फोटो लावणे शुभ मानले जाते. यामुळे मुलाचे आरोग्य चांगले राहते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT