Vastu Tips for money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना 'हे' नियम फॉलो न केल्यास होऊ शकते आर्थिक नुकसान

वास्तुनुसार घरात मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. पण हे रोप लावतांना कोणते नियम पाळले पाहिजे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात झाडे लावणे शुभ मानले जाते. पण घरात झाडे लावताना काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रातील नियम पाळल्यास घरात सुख-शांती लाभते.

घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात हे रोप असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. म्हणूनच अनेक लोक मनी प्लांट घरी लावतात. मनी प्लांट घराचे सौंदर्य वाढवते. पण त्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

वास्तूनुसार हे रोप कुठे लावावे आणि कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

कोणते नियम फॉलो करावे

मनी प्लांट घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता टिकून ठेवते. त्यामुळे घराबाहेर हे रोप कधीही लावू नये.

मनी प्लांट नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतच लावावे.

एखादी व्यक्ती कितीही खास असली तरी त्याच्यासोबत मनी प्लांट भेट म्हणून देऊ नये. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. या दिशेला मनी प्लांट लावल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

वास्तुनुसार मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा उत्तम मानली जाते. ही दिशा शुभ आहे. कारण ही श्रीगणेशाची दिशा मानली जाते.

तसेच मनी प्लांट नेहमी हिरवागार ठेवावा.  सुकलेले मनी प्लांट घरात ठेवल्यास अशुभ मानले जाते.

जर तुमच्या घरी मनी प्लांट असेल तर त्याला वेळोवेळी पाणी देत ​​राहा. जर मनी प्लांट काचेच्या बाटलीत किंवा भांड्यात लावला असेल तर त्याचे पाणी देखील बदलत रहा.

वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कोणालाही भेट देऊ नका. त्यामुळे सुख-समृद्धी कमी होते.

मनी प्लांट प्लास्टिकच्या बाटलीत किंवा भांड्यात लावू नका. मनी प्लांट लावण्यासाठी मातीचे भांडे वापरणे शुभ मानले जाते.

मनी प्लांटचे रोप जमिनिला स्पर्श करू देऊ नका. त्याला नेहमी जमिनीच्यावर ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT