Tortoise Ring Benefits: कासवाची अंगठी घालतांना कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात

कासवाची अंगठी घालणे शुभ मानले जाते. पण त्या संबंधित असलेले नियम देखील पाळणे आवश्य आहे.
Tortoise Ring
Tortoise RingDainik Gomantak

Tortoise Ring Benefits: अनेक लोकांना विविध प्रकारच्या अंगठ्या घालायला आवडतात. मार्केटमध्ये देखील विविध डिझाइन आणि रंगाच्या अंगठ्या सहज मिळतात. तरी सुद्धा अनेक लोकांच्या बोटात तुम्ही कासवाची अंगठी पाहली असेल. ती अंगठी घालण्यामागे काही धार्मिक कारणे देखील असु शकतात. ही अंगठी घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच सुख,शांती आणि समृद्धी लाभते असे मानले जाते.पण कासवाची अंगठी घालतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

स्वच्छता

कासवाची अंगठी घरी आणल्यावर दूध किंवा गंगाजलने स्वच्छ धुवावे. कारण यामुळे अंगठी स्वच्छ आणि चमकदार बनते.

माता लक्ष्मी

यानंतर कासवाच्या अंगठीला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे. नंतर पुजा करावी. नंतरच अंगठी बोटामध्ये घालावी.

कोणता दिवस शुभ

कासवाची अंगठी घालताना दोन दिवसांना महत्व दिले आहे. त्यात गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवशी अंगठी घालणे शुभ मानले जाते. कारण यामुळे तुमच्या जावनातील आर्थिक समस्या कमी होऊ शकतात.

Tortoise Ring
Night Skin Care: चमकदार त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर दुधात चिमुटभर मिक्स करून लावा 'हा' पदार्थ

अंगठी कशी घालावी

कासवाची अंगठी घालतांना खास काळजी घ्यावी. अंगठी बोटात घालताना कासवाचे तोंड तुमच्या खांद्याकडे असावे. यामुळे नोकरी आणि बिझनेसमध्ये भरभराटी येते.

चांदीची अंगठी

कासवाची चांदीची अंगठी घालणे शुभ मानले जाते. यामुळे अनेक फायदे मिळतात. चांदीच्या अंगठीमुळे निरोगी आयुष्य लाभते. तसेच कुटूंबातील सर्व समस्या कमी होतात.

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी

कासवाची अंगठी बोटात घातल्याने मुलांना खुप फायदा होतो. आठवड्यातून दोन दिवस अंगठी घातल्याने करिअरमध्ये यश मिळते. तसेच तुमचे आयुष्य चमकु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com