Vacuum Cleaner:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vacuum Cleaner: व्हॅक्यूम क्लिनर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

Puja Bonkile

व्हॅक्यूम क्लीनर आजकाल खूप सामान्य झाले आहेत. तुम्हाला शहरांमधील बहुतेक घरांमध्ये व्हॅक्यूम क्लीनर सापडतील. लोक त्यांच्या गरजेनुसार व्हॅक्यूम क्लिनर विकत घेतात, परंतु जेव्हा सर्वोत्तम व्हॅक्यूम क्लिनरचा विचार केला जातो तेव्हा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर घ्यायचे की हॅन्डहेल्ड व्हॅक्यूम क्लिनर हे ठरवू शकत नाही. जाणून घेऊया कोणते सर्वोत्तम आहे.

रोबोट्स आणि हँडहेल्ड्समधील प्रमुख फरक काय आहेत?

या दोघांमधील मोठा फरक वापरण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. रोबोट क्लिनर स्वयंचलित आहे तर हॅन्डहेल्ड क्लिनर हाताने धरून वापरावे लागते. असे म्हणता येईल की रोबोट व्हॅक्यूम क्लिनर वापरण्यास सोपा आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने हॅन्डहेल्ड अधिक चांगले आहे. कारण त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रत्येक कोपरा स्वच्छ करू शकता. रोबोट क्लीनरचा एक मोठा तोटा म्हणजे ते सर्व क्षेत्र स्वच्छ करू शकत नाहीत.

रोबोट क्लिनरचे फायदे काय आहेत?

Robo clean चे स्वतःचे फायदे देखील आहेत. मोठा फायदा असा आहे की तुम्हाला ते स्वतः ऑपरेट करण्याची गरज नाही. हे फोन आणि व्हॉइस कमांडद्वारे ऑपरेट केले जाऊ शकतात. रोबोट क्लिनरमध्ये वाय-फाय सपोर्टही उपलब्ध आहे. यामध्ये लोकेशनद्वारे मॅपिंगही केले जाते.

हँडहेल्ड क्लिनरचे फायदे काय आहेत?

हँडहेल्ड क्लीनरचे दोन प्रकार आहेत. पहिला वायर्ड आणि दुसरा वायरलेस आहे. वायर्डला इलेक्ट्रिक पॉवरशी जोडून वापरावे लागते आणि वायरलेसमध्ये बॅटरी असते. जी चार्ज केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी वापरली जाऊ शकते. हँडहेल्ड क्लिनरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात वापरू शकता. ज्या ठिकाणी रोबोट क्लिनर पोहोचू शकत नाही त्या ठिकाणे आणि भिंती देखील स्वच्छ करू शकतात. याशिवाय, हँडहेल्ड क्लिनरचे पॉवर सक्शन खूप जड आहे जे अधिक घाण साफ करण्यासाठी चांगले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT