Body Fat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Body Fat: गुड फॅट Vs बॅड फॅट: कोणते फॅट आरोग्यासाठी फायदेशीर आणि घातक?

Healthy Fats For Body: जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा यादरम्यान शरीरात जमा झालेले अतिरिक्त फॅट कमी होते. अनेक लोकांमध्ये फॅटबद्दल अनेक गैरसमज आहेत.

Manish Jadhav

जेव्हा जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा यादरम्यान शरीरात जमा झालेले अतिरिक्त फॅट कमी होते. अनेक लोकांमध्ये फॅटबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते त्यास वजन वाढण्याचे प्रमुख कारण मानतात, परंतु ते पूर्णपणे खरे नाही. आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, यामध्ये फॅट देखील समाविष्ट आहे.

फॅट हा शरीरासाठी ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे. शरीरातील सर्व अवयवांच्या कार्यासाठी फॅट गरजेचे असते. जास्त फॅट शरीरासाठी हानिकारक असू शकते, परंतु मर्यादित प्रमाणात फॅट शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. फॅटचे दोन प्रकार आहेत: गुड आणि बॅड. एक जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि दुसरे जे आपल्या शरीराला हानी पोहोचवते. चला तर मग तज्ञांकडून गुड आणि बॅड फॅटबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया...

तज्ञ काय सांगतात?

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. अली शेर सांगतात की, गुड फॅट आणि बॅड फॅटचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. गुड फॅट शरीराला ऊर्जा प्रदान करते, जे हृदय आणि पेशी मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असते, तर बॅड फॅट कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि लठ्ठपणासारखे आजार निर्माण करते.

गुड फॅटयुक्त पदार्थ

गुड फॅटचे दोन प्रकार आहेत: मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, जे ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल तेल, काजू (जसे की बदाम, अक्रोड), मासे (जसे की सॅल्मन, ट्यूना) आणि एवोकॅडोमध्ये आढळते. हे फॅट शरीरासाठी फायदेशीर असते. गुड कोलेस्ट्रॉल वाढवून बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. म्हणून, आपण आपल्या आहारात (Diet) गुड फॅटचा समावेश केला पाहिजे, परंतु ते मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतले पाहिजे.

बॅड फॅट

जसे गुड फॅटचे दोन प्रकार आहेत तसेच बॅड फटचेही दोन प्रकार आहेत. एक सॅच्युरेटेड आणि दोन ट्रान्स फॅट्स. सॅच्युरेटेड फॅट हे प्रामुख्याने लाल मांस, लोणी, चीज आणि पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते, तर ट्रान्स फॅट हे प्रक्रिया केलेले पदार्थ, बेकरी आयटम, तळलेले पदार्थ आणि पॅकेज्ड स्नॅक्स (जसे की नमकीन, बिस्किटे, पिझ्झा) मध्ये आढळते.

ट्रान्स फॅट हे सर्वात हानिकारक आहे. ते शरीरात जळजळ निर्माण करते, रक्तवाहिन्या ब्लॉक करते आणि हृदयरोगाचा धोका अनेक पटींनी वाढवते. म्हणून, निरोगी राहण्यासाठी आपण प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजेत. आपण आपल्या आहारात गुड फॅटचे स्रोत समाविष्ट केले पाहिजेत. खाद्यपदार्थ खरेदी करताना नेहमी लेबल पाहत जा. "हायड्रोजनेटेड ऑइल" किंवा "ट्रान्स फॅट" असलेले पदार्थ टाळा. संतुलित आहार घेण्यासोबत नियमित व्यायाम करुन शरीरातील बॅड फॅट कमी करता येते. निरोगी राहण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT