Indonesia Mosque Blast
Indonesia Mosque BlastDainik Gomantak

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

Indonesia Mosque Blast: स्टेट सीनियर हायस्कूल या शाळेच्या आवारातील एका मशिदीत शुक्रवारी (7 नोव्हेंबर) नमाजादरम्यान मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली.
Published on

Indonesia Mosque Blast: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील केलापा गेडिंग परिसरातील स्टेट सीनियर हायस्कूल या शाळेच्या आवारातील एका मशिदीत शुक्रवारी (7 नोव्हेंबर) नमाजादरम्यान मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

नमाजाच्या वेळी थरकाप

दुपारी सुमारे 12:30 वाजता नमाज सुरु असताना मशिदीच्या मुख्य हॉलच्या मागील बाजूला हा जोरदार स्फोट झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण पसरले. बुदी लकसोनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रवचन (खुत्बा) सुरु होताच अचानक मोठा स्फोट झाला. संपूर्ण मशिद धुराने भरुन गेली. यामुळे घाबरलेले विद्यार्थी आणि नमाजी रडत आणि किंचाळत बाहेर पळू लागले. बहुतेक जखमींना काचेचे तुकडे लागून जखमा झाल्या. एवढेच नाहीतर मोठ्या आवाजामुळे त्यांच्या कानावर परिणाम झाला. जखमींना तात्काळ जवळच्या केलापा गेडिंग क्लिनिकमध्ये हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Indonesia Mosque Blast
Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

संशयास्पद वस्तू आणि तपास

ही शाळा नेव्हीच्या कंपाउंडमध्ये असल्यामुळे, स्फोट होताच नौदल जवान आणि जकार्ता पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. पोलिसांनी (Police) सुरुवातीला शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बिघाडामुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र, तपासणीत काही संशयास्पद वस्तू सापडल्याने हा घातपात असल्याचा संशय वाढला. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला घटनास्थळावरुन बॉम्बचे काही पार्ट, रिमोट कंट्रोल, एअरसॉफ्ट गन आणि रिव्हॉल्व्हरसारखी शस्त्रे मिळाली आहेत.

Indonesia Mosque Blast
Indonesia Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं इंडोनेशिया; किनारपट्टी भागात रिश्टर स्केलवर तीव्रता 7.6

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पुरावे आणि संशयास्पद वस्तू न्यायवैद्यक (Forensic) आणि बॉम्ब डिस्पोजल तज्ज्ञांकडून तपासले जात आहेत. सध्या या घटनेवर कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. सध्या शाळा बंद असून, परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून लवकरच या घटनेचा सविस्तर रिपोर्ट प्रसिद्ध केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com