Manish Jadhav
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ह्रदयाशी संबंधित समस्यने अनेकांना ग्रासलं आहे. यातच, पुरुषांबरोबर महिलांनाही ह्रदयरोगाच्या समस्येने घेरले आहे.
ज्या महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना हृदयरोगाचा धोका वाढतो.
महिलांना कोणत्याही वयात हृदयरोग होऊ शकतो, परंतु मासिक पाळी थांबल्यानंतर, म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर हा धोका अधिप पटीने वाढतो.
हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी हृदय निरोगी ठेवणे गरजेचे ठरते. यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात काही पदार्थांचे सेवन केल्यास हा धोका टळू शकतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात ब्रोकोली, गाजर आणि पालक, कोलार्ड ग्रीन्स, केल आणि कोबी सारख्या पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी सफरचंद, केळी, संत्री, नाशपाती, द्राक्षे आणि मनुका अशी भरपूर फळे खावीत.