विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Germany Crime News: पश्चिम जर्मनीतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली, जिथे एका नर्सनेच आपल्या 10 रुग्णांची हत्या केली.
Germany Hospital Serial Killer
Germany Crime NewsDainik Goantak
Published on
Updated on

Germany Hospital Serial Killer: रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर असलेला नागरिकांचा विश्वास हाच आरोग्य व्यवस्थेचा आधार असतो. मात्र, पश्चिम जर्मनीतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली, जिथे एका नर्सनेच आपल्या 10 रुग्णांची हत्या केली आणि 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केला.

भीषण हत्याकांड आणि जन्मठेपेची शिक्षा

पश्चिम जर्मनीतील (Germany) एका न्यायालयाने एका नर्सला 10 रुग्णांच्या हत्येप्रकरणी आणि 27 रुग्णांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या क्रूर कृत्यामागील कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल. ही अमानुष घटना डिसेंबर 2023 ते मे 2024 या कालावधीत पश्चिम जर्मनीतील वुर्सेलन शहरातील एका रुग्णालयात घडली.

Germany Hospital Serial Killer
Germany Shooting: जर्मनीच्या हॅम्बर्ग चर्चमध्ये बेछुट गोळीबार; 6 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

नर्सने तिच्याकडून उपचार घेत असलेल्या विशेषत: वृद्ध रुग्णांना विषारी इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केली. तपासात उघड झाले की, आरोपी नर्सला रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याचा आणि कामाच्या अतिरिक्त ताणाचा त्रास होता. या चिडचिडेपणामुळे आणि स्वतःचा त्रागा मिटवण्यासाठी तिने रुग्णांवर कोणतीही सहानुभूती न दाखवता हे क्रूर कृत्य केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नर्सने एकूण 37 हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात घातला होता.

न्यायालयाची कठोर भूमिका

दोषी नर्सला शिक्षा सुनावताना न्यायालयाने (Court) तिचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. वैद्यकीय व्यवसायातील जबाबदारी आणि रुग्णांचा विश्वास मोडल्याबद्दल न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली. आरोपी नर्सने 2007 मध्ये नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि 2020 मध्ये तिने वुएर्सेलन रुग्णालयात काम करण्यास सुरुवात केली होती. 2024 मध्ये तिला अटक करण्यात आली. या घटनेनंतर तिच्या कार्यकाळात उपचार घेतलेल्या अन्य रुग्णांच्या प्रकरणांचीही कसून चौकशी केली जात आहे, जेणेकरुन आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, हे तपासले जाईल.

Germany Hospital Serial Killer
Germany Get's New Defence Minister: बोरिस पिस्टोरियस बनले जर्मनीचे नवे संरक्षण मंत्री

'सिरीअल किलर' नील्स होगेलची आठवण

या प्रकरणाची तुलना जर्मनीतील सर्वात कुप्रसिद्ध नील्स होगेल (Niels Högel) याच्या प्रकरणाशी केली जात आहे. होगेलने 1999 ते 2005 या काळात 85 रुग्णांची हत्या केली होती आणि त्याला 2019 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याची ही दुसरी मोठी घटना जर्मनीमध्ये घडली. या घटनेमुळे रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या, कामाचा ताण आणि सुरक्षिततेच्या मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com