Tricolor Pasta Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tricolor Pasta Recipe: या स्वातंत्र्यदिनी काहीतरी स्पेशल! घरी बनवा टेस्टी तिरंगी पास्ता; वाचा पूर्ण रेसीपी

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला आपल्या लहान मुलांना काहीतरी चमचमीत खायला द्या.

Kavya Powar

Tricolor Pasta Recipe: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला आपल्या लहान मुलांना काहीतरी चमचमीत खायला द्यायच असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी. पास्ता कुणाला आवडत नाही? लहान मुलांची तर ही आवडती डिश आहे. चला तर मग आज बनवूया तिरंगी पास्ता. शेवटपर्यंत रेसीपी नक्की वाचा.

साहित्य

  • 2 कप पास्ता

  • 3 चमचे मैदा

  • 5 चमचे दूध

  • 1/2 कप तेल

  • चवीनुसार मीठ

  • बटर

  • 1 टीस्पून चिलीफ्लेक्स

  • 1-2 सिमला मिरची

  • 2 टोमॅटो

  • पास्ता मसाला

  • 1 टीस्पून जिरे

  • फूड कलर हिरवा आणि केशर)

  • 1 किसलेले गाजर

  • चिली सॉस

  • 1 कांदा

  • 4-5 लसूण पाकळ्या

कृती

1. प्रथम पास्ता उकडून घ्या. त्यात एक चमचा तेल घाला. पास्ता उकडला की चाळणीत गाळून घ्या. आणि त्याचे तीन भाग करा.

2. पांढरा पास्ता बनवण्यासाठी पॅन घ्या. त्यात बटर टाका, नंतर त्यात थोडे जिरे टाका आणि बारीक चिरलेला लसूण टाका आणि तळून घ्या. जिरे आणि लसूण तडतडल्यावर त्यात 2 चमचे मैदा घालून भाजून घ्या. थोडं तळून झाल्यावर त्यात सर्व दूध घालून चांगलं शिजवून घ्या, नंतर त्यात पास्ता टाका. काही चिली फ्लेक्स आणि मीठ आणि थोडा पास्ता मसाला घाला. नीट मिक्स करून एका भांड्यात काढा.

3. आता हिरवा पास्ता बनवण्यासाठी प्रथम एका कढईत कांदा आणि जिरे परतवून घ्या, नंतर बारीक चिरलेली सिमला मिरची घाला, थोडे शिजवा, नंतर पास्ता मसाला आणि पास्ता घाला, थोडा चिली सॉस घाला आणि चवीनुसार मीठ घाला. वर थोडा हिरवा फूड कलर घाला. ते मिक्स करून एका भांड्यात काढा.

4. आता केशरी रंगाचा पास्ता बनवण्यासाठी कढईत थोडे तेल टाका. नंतर त्यात कांदा आणि जिरे टाका. नंतर त्यात गाजर आणि टोमॅटो टाका आणि थोडा वेळ शिजू द्या. शिजल्यावर पास्ता घाला आणि टोमॅटो सॉस, पास्ता मसाला, मीठ आणि केशरी फूड कलर घाला आणि चांगले मिसळा.

अशाप्रकारे तयार आहे तीन फ्लेवर्स असलेला तिरंगा पास्ता. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी-जास्त भाज्या घालू शकता. तिरंगा पास्ता खा आणि तिरंग्याचा आनंद घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT