Tick Tock Day 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tick Tock Day 2022: सरत्या वर्षाची आठवण करून देणारा 'हा' दिवस, जाणून घ्या महत्व

टिक टॉक डे वेळेचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

आज 29 डिसेंबर म्हणजेच 'टिक टॉक' दिन. दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सरत्या वर्षाची आठवण करून देणारा असा दिवस आहे. त्यामुळे तुमच्या टू डू लिस्टमध्ये काही कामे करायची बाकी असतील तर ती आत्ताच करून घ्या. टिक टॉक डे हा त्याचीच आठवण करून देणारा दिवस आहे. पण, टिक टॉक दिन कधीपासून सुरु झाला याची माहिती आम्ही सांगणार आहोत.

  • टिक टॉक दिनाचे महत्त्व काय

टिक टॉक डे वेळेचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी 29 डिसेंबर रोजी, जगभरातील लोक एकत्र येतात आणि प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे आणि ते त्याचा पुरेपूर उपयोग कसा करू शकतात हे सांगण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे कालांतराने आनंद करण्याचा आणि आपल्या जीवनातील सर्व अद्भुत गोष्टींसाठी आभार मानण्याची संधी निर्माण करणारा आहे.

  • टिक टॉक डे सेलिब्रेशन

तुम्हाला सुद्धा यावर्षीचा टिक टॉक दिन साजरा करायचा आहे. तर तुम्ही काही छोट्या गोष्टींनी त्याची सुरुवात करू शकतात. तुमची घड्याळं एका मिनिटाने पुढे ठेवा. घड्याळातील बदलत्या वेळेकडे लक्षपूर्वक पाहा. आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. काही काळ आपल्या सभोवतालच्या टिक टॉकच्या आवाजांचा आनंद घ्या. टिक टॉक डे हा खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT