Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

Military Convoy Accident News: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Military Convoy Accident News
Army Vehicle AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे वाहन अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याने या अपघातात 10 जवानांना आपले प्राण गमवावे लागले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना खानी टॉप परिसरात घडली, जिथे लष्कराचे एक बुलेटप्रूफ वाहन 17 जवानांना घेऊन उंचीवर असलेल्या पोस्टच्या दिशेने जात होते. मात्र, दुर्गम रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि क्षणात हे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघाताने (Accident) संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून लष्कराने तातडीने मदत कार्य सुरु केले आहे.

Military Convoy Accident News
Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

अपघाताची माहिती मिळताच लष्कराच्या बचाव पथकाने आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो भाग अत्यंत दुर्गम आणि प्रतिकूल हवामानाचा असल्याने मदत कार्यात सुरुवातीला अनेक अडथळे आले. असे असूनही बचाव पथकाने दरीत उतरुन जवानांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर केले. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले असून, इतर 7 जवानांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यापैकी 4 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, ज्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने एअरलिफ्ट करुन उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Military Convoy Accident News
Indian Army: देशात नवं सरकार स्थापन होताच लष्कराची ताकद वाढणार; K-9 वज्र ऑटोमॅटिक हॉवित्झर सारख्या सौद्यांना मिळणार मंजूरी!

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन बुलेटप्रूफ असल्याने त्याचे वजन अधिक होते. ज्या वेळी हे वाहन दरीत कोसळले, त्यावेळी त्याचा वेग आणि दरीची खोली पाहता आतील जवानांना स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. हा अपघात ज्या भागात झाला, तिथे रस्ते अत्यंत अरुंद आणि वळणावळणाचे आहेत.

शिवाय, डोंगराळ भागात अनेकदा धुक्यामुळे किंवा निसरड्या रस्त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण भारतीय लष्करावर शोककळा पसरली असून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात येत आहे. या घटनेनंतर लष्कराने अपघाताच्या कारणांचा सविस्तर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीरांच्या बलिदानामुळे संपूर्ण देश हळहळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com