Viral Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video: 'थम्स अप पाणी पुरी'! सोशल मीडियावर झाली व्हायरल; तुम्हाला आवडेल का?

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आवडते स्ट्रीट फुड म्हणजे पाणीपुरी

दैनिक गोमन्तक

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आवडते स्ट्रीट फुड म्हणजे पाणीपुरी. जे लोक फुडी असतात, ते अनेक वेळा वेगवेगळे पदार्थ चाखतात. जे बघून विचित्र वाटत. सोशल मीडियाच्या वाढत्या ट्रेंडमध्ये आजकाल अनेक प्रकारचे विचित्र फूड कॉम्बो व्हिडीओ समोर येत आहेत, जे पाहून यूजर्स कधी हसतात तर कधी ते चिडतात.

देशातील सर्वात प्रसिद्ध आणि तोंडाला पाणी आणणारा स्ट्रीट फूड पाणीपुरीचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला 'थम्स अप' पाणीपुरीची चव चाखतांना दिसत आहे. ती पाणीपुरीचे खूप कौतुक करत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पाणीपुरीमध्ये थम्स अप कोल्ड्रिंक भरून सर्व्ह करताना दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @MFuturewala अकाऊंट युजरने शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला (Women) खास खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी कोलकात्याच्या दुकानात पोहोचली आहे. त्यावर दुकानदाराने प्रथम थम्स अप कोल्ड्रिंक एका भांड्यात टाकले, त्यानंतर त्यात थोडा मसाला मिक्स केला आहे. त्यानंतर पाणीपुरीमध्ये थम्स अप देण्यात आले. महिलेने हे विचित्र कॉम्बिनेशन खाल्ले आणि तिला ते आवडले असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'थम्स अप' पाणीपुरीचा आस्वाद खाणाऱ्या महिलेला कदाचित हा प्रयोग आवडला असेल, पण सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडीओ पाहणाऱ्या अनेक युजर्सना हा प्रयोग आवडला नाही. एका यूजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये लिहिले की, 'आता हे पाहून मला रात्री झोप येणार नाही', तर दुसऱ्या यूजरने लिहिले की 'पृथ्वीवर लोक चांगल्या पदार्थांवर प्रयोग का करतात?' कोलकाताचे दुकान महाराजा चाट सेंटर दिलीप दा यांचे आहे. त्यांच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी दिली जाते. यामध्ये चॉकलेट, आंबा, अननस, स्ट्रॉबेरी, नारळपाणी, राजभोग अशा वेगेवेगळ्या फ्लेवर्समध्ये पाणीपुरीचा आस्वाद चाखायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT