Buddha Purnima 2023
Buddha Purnima 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Buddha Purnima 2023: बुद्ध पौर्णिमेला घरात 'या' वस्तु आणल्यास लाभेल सुख-शांती

दैनिक गोमन्तक

Buddha Purnima 2023: आज देशभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. वैशाख महिन्यात येणारी ही पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

वैशाख महिन्यातील पौर्णिमा हा गौतम बुद्धांचा जन्मदिवस होता आणि त्यामुळे या दिवसाला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.

शास्त्रानुसार भगवान गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार मानले जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी वस्तूंची खरेदी करतात.

बुद्ध पौर्णिमेला काही वस्तु घरात आणणे शुभ मानले जाते. या वस्तु कोणत्या आहेत हे जाणून घेउया.

  • पितळीचा हत्ती

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पितळी हत्ती घरी आणणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पितळेचा हत्ती घरी आणल्यास घरातून दारिद्र्य कमी होते आणि कुटुंबात सुख-शांती सोबतच धन-समृद्धी वाढते.

  • बुद्धमुर्ती

बुद्धांची मूर्ती घरात आणणे खूप शुभ मानले जाते. कारण फेंगशुईनुसार, गौतम बुद्धाच्या मूर्ती शुभ आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. म्हणूनच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाची मूर्ती घरी नक्की आणली पाहीजे.

  • चांदीचं नाणं

चांदीचं नाणं बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरात सोन्या-चांदीची नाणी आणणे खूप शुभ मानले जाते. खास करुन चांदीचे नाणे आणणे खूप शुभ असते. असे केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विशेष कृपा राहते.

  • श्रीयंत्र

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घरी श्रीयंत्र नक्की आणावे. असे मानले जाते की श्रीयंत्रामध्ये देवी लक्ष्मी वास करते. वैशाख पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर घरी आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT