Benefits of Lip Balm in Summer: उन्हाळ्यात ओठ फाटल्यानंतर लिप बाम लावल्याने खरचं फायदा होतो का? वाचा सविस्तर

लिप केअरमध्ये लिप बामचा अधिक वापर केला जातो.
Lip Balm
Lip BalmDainik Gomantak
Published on
Updated on

Benefits of Lip Balm in Summer: उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्यात ओठांच्या कोरडेपणामुळे ओठ कोरडे, फाटलेले दिसू लागतात.

अनेक लोकांच्या ओठातून रक्तही येऊ लागते. अनेक लोकांना अशी समस्या हिवाळ्यात देखील होते. कारण त्या काळात हवेत आद्रर्ता असते.

कडक उन्हाळ्यातही ओठ कोरडे पडु लागतात. लोक अनेकदा फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावतात. पण आधीच फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावणे कीती फायदेशीर आहे? हे जाणून घेउया.

  • फाटलेल्या ओठांवर लिप लावावे का?

फाटलेल्या ओठांवर तुम्ही लिप बाम लावू शकता. ते लावण्यासाठी लक्षात ठेवा की असे लिप बाम वापरा ज्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही लिप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता.

फाटलेल्या ओठांचा सामना करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा आणि झोपण्यापूर्वी लावावे. जर तुमचे ओठ खूप कोरडे आणि फाटलेले असतील तर याचा जाड थर लावा.

  • लिप बाम लावण्याची योग्य वेळ

सकाळी आंघोळीनंतर लगेच लिप बाम लावावा. यामुळे ओठांवर ओलावा कायम राहतो. हे एक संरक्षणात्मक आवरण प्रदान करते आणि दिवसभर तुमची त्वचा (Skin) हायड्रेशनसाठी तयार करते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी लावावे.

Lip Balm
Health Benefits of Dry Fruits: 'हे' 5 पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास राहाल निरोगी
  • फाटलेल्या ओठांवर लिप बाम किती वेळा लावावा?

रिपोर्ट्सनुसार तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा फाटलेल्या ओठांवर लिप बाम लावू शकता. जर हवामान उष्ण आणि दमट असेल तर ओठ हायड्रेट ठेवण्यासाठी नेहमी लिप बाम लावावा.

  • काळ्या ओठांवर उपाय

* लिबांच्या सेवनाने ओठांचा काळेपणा कमी पाडू शकतो.

* ओठांचा मऊपणा वाढवण्याची ऑलिव्ह ऑइल देखील फायदेशीर ठरते.

* रोज रात्री झोपताना क्रिम लावल्याने ओठांचा काळेपणा कमी होतो.

* पाणी आणि रसाळ फळे खाल्ल्याने ओठ हायड्रेट राहतात. यामुळे ओठ काळे पडत नाही.

* धूमपान सोडल्याने ओठांचा काळेपणा कमी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com