Heart Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Attack Tips: हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी 'ही' 5 पिवळी फळं ठरतात फायदेशीर

अयोग्य आहार आणि धावपळीच्या जीवनशैलीत हृदया संबंधित आजार निर्माण होतात. यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Heart Attack Tips: हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयाची काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात तसेच आहारात देखील बदल करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते फळ खावे.

  • आंबा

आंबा हा फळांचा राजा आहे. उन्हाळ्यात हे फळ खाण्याची मज्जाच वेगळी असते. गोड आणि स्वादिष्ट फळाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आंबा खाऊ शकता. आंबा खाल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

  • लिंबू

लिंबुमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसेच हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध अन्न आहे. जे सॅलडपासून लिंबूपाणीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरले जाते. लिंबु हृदयाचे आरोग्य सुधारण्यासह वजन कमी करण्यास मदत करते.

  • केळी

केळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदयाच्या आरोग्य देखील निरोगी राहते. यामुळे ज्या लोकांना हृदय संबंधित आजार असेल तर केळी खाणे खावे. केळीमध्ये पोटॅशिअम असते. तसेच पचनसंस्था सुरलित कार्य करते.

  • अननस

अननसाचा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की ते खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. यापेक्षा जास्त खाऊ नये कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

  • पिवळी शिमला मिर्ची

या मिर्चीमध्ये फायबर, लोह आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि त्याच वेळी शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि हृदय देखील निरोगी राहते.

  • हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय करावे?

गायक केकेचे 2022 मध्ये जेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम झाले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अनेक ब्लॉकेजेस आहेत आणि त्यांना वेळीच सीपीआर दिला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते.

हृदयविकाराचा झटका आल्यास, रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे, जर जवळपास वैद्यकीय मदत उपलब्ध नसेल तर रुग्णाला सीपीआर द्यायाला सुरूवात करावी.  

  • CPR म्हणजे काय?

सीपीआरला खरंतर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणतात. ज्यामध्ये बेशुद्ध रुग्णाच्या छातीवर दबाव टाकला जातो आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. ज्यामुळे फुफ्फुसात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही. 

त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि श्वासोच्छवासाच्या त्रासात व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. सीपीआर ही आपत्कालीन परिस्थितीत दिली जाणारी वैद्यकीय चिकित्सा मानली जाते. ही एक प्रयत्न केलेली आणि चाचणी केलेली पद्धत आहे. ज्याने श्वासोच्छवासाच्या समस्यांमुळे ग्रस्त असलेल्या लोकांचे प्राण वाचवले आहेत.
 

  • अँजिओप्लास्टीमुळे जीव वाचेल

सहसा हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया केली जाते. ही कार्डिओलॉजीची प्रक्रिया आहे. ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील अडथळे दूर करून त्या उघडल्या जातात. अनेक प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या कोरोनरी धमन्यांमध्ये स्टेंट देखील टाकले जातात, जेणेकरून रक्तप्रवाहात कोणतीही अडचण येऊ नये.

  • हार्ट अ‍ॅटॅक येण्यापुर्वी मिळतात हे संकेत

हृदयाच्या धमण्या ब्लॉक झाल्यावर आपल्याला छातीमध्ये जड वाटू शकते. तुम्ही थोडे मेहनतीचे काम केले तर तुम्हाला दम लागणे, छातीत दुखणे , गुदमरणे, अस्वस्थता आणि बैचेनी वाटू शकते.

थकवा जाणवणे, श्वासाची गती वाढणे, हृदयाची धडधड वाढणे अशा प्रकारचे संकेत तुमच्या धमण्या तुम्हाला देत असतात. याशिवाय हृदयाचे इतर आजार, मधुमेह आणि हाय बल्ड प्रेशर यामुळे छातीतल्या दुखण्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढू शकते.

  • हृदयाला असे ठेवा निरोगी

1. तंबाखूचे सेवन बंद करा.

2. दारुपासून दूर राहा.

3. मधूमेह , हाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांनी नियमित चेकअप केले पाहिजे.

4. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

5. दररोज कमीतकमी 7-8 तास चांगली झोप घ्या.

5. सकस आहार घ्या.

8. जंकफूड, जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा.

9. वजन( Weight ) नियंत्रणात ठेवा.

10. नियमित व्यायाम करा. आठवड्यातले 5 दिवस 35-45 मिनिट तुम्ही चालण्याचा व्यायाम करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT