Healthy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

लाइफस्टाइलमधील 'हे' 5 बदल हाडांचे आरोग्य ठेवतील निरोगी

हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Healthy Tips For Bones: निरोगी आरोग्यासाठी होडांचे आरोग्य देखील चांगले असले पाहिजे. पण बिझी लाइफस्टाइलमुळे लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे लाइफस्टाइलमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो.

  • मद्यपान आणि धूम्रपान कमी करावे

मद्यपान आणि ध्रुमपान केल्याने हाडांवर विपरित परिणाम होऊ शकतो. या पदार्थांचे सेवन अतिप्रमाणात केल्याने कॅल्शिअम आणि पोषक घचकांचे प्रमाण कमी होते. यामुळे हाडे ठिसुळ होतात. यामुळे उठणे-बसणे यासारख्या हालचाली करणे कठिण होते. हाडांचे आरोग्य निरोगी ठावायचे असेल तर मद्यपान आणि धूम्रपान कमी करावे

  • पोषक पदार्थांचे सेवन

मजबूत हाडांसाठी संतुलित, पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. मजबूत आणि निरोगी हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हे पोषक घटक दुग्धजन्य पदार्थ, सी फुड आणि हिरव्या भाज्यांमध्ये असतात. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा उत्तम स्त्रोत आहे. या पोषक तत्वांची कमतरता असल्यास हाडे ठिसुळ होऊ शकतात.

  • योगा करावा

जेव्हा आपण व्यायाम किंवा योगा करतो तेव्हा वजन नियंत्रणात राहते आणि हाडे देखील मजबुत राहतात. हाडांची डेंसिटि वाढवून हाड मजबुत होतात. यामुळे हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी चालणे, धावणे यासारख्या गोष्टी करणे आवश्यक आहे.

  • वजनावर नियंत्रण ठेवावे

हाडे निरोगी ठेवण्यासाठी शरीराचे वजनही नियंत्रणात ठेवावे लागते. वजन जास्त किंवा कमी असल्याचा देखील हाडांवर परिणाम होतो. जर कमी वजन असेल तर हाडांची डेंसिटि कमी होते आणि जास्त वजनामुळे हाडांची क्वॉलिटी खराब होऊ शकते.

  • नियमितपणे हेल्थ चेकअप करावे

हाडांचे आरोग्या निरोगी आणि मजबुत ठेवायचे असेल तर नियमितपणे डेंसिटी स्कॅन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी ची तपासणी करावी. हेल्थ चेकअपमुळे शरीर उद्भवणाऱ्या अनेक आजारांपासून दूर राहतो.

लाइफस्टाइलमधील असे छोटे बदल आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते आणि मजबुत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT