लाइफस्टाइल

गोव्यातील धितीच्या आर्त आवाजाची जादू

दैनिक गोमन्तक

एका उच्च निर्मितीमूल्य असलेल्या कन्नड सिनेमात कोकणी गाणे असणे आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हणून युट्युबवर प्रकाशित झालेल्या या गाण्याला (Song) दहा दिवसात 26 लाखांवर दर्शक मिळणे ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. नाही का?

आणि हे पण हे अतर्क्य घडले आहे. रक्षित शेट्टी हा प्रसिद्ध अभिनेता, नायक असलेल्या ‘777 चार्ली’ या कन्नड चित्रपटातले हे गाणे, समाजमाध्यमातून सारीकडे पोहोचले आहे. या चित्रपटाची (Movie) निर्मिती स्वतः रक्षित शेट्टी यांचीच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे गाणे गाणारी गायिका कुणीही नामवंत किंवा प्रस्थापित नाही. ती आहे अवघ्या अठरा वर्षांची गोमंतकीय युवती धिती लोटलीकर. आणखीन एक आश्चर्य म्हणजे धिती गाणे शिकलेलीही नाही पण गाणे गायला तिला आवडते. ती आपल्या लहानपणापासून गाणे गात आली आहे. ‘777 चार्ली’ या सिनेमासाठी धितीने म्हटलेले हे कोकणी गाणे ऐकल्यास, तिच्या आवाजातला कोवळा परंतु आर्त गुण या गाण्याच्या एकंदरच ट्रीटमेंटला अतिशय सुयोग्य साथ करत असल्याचे दिसून येईल. अर्थात या गाण्याचे संगीतकार नॉबिन पॉल यांची ही रचना ऐकणाऱ्याच्या मनावर पकड घेते. नॉबिन पॉल हे कन्नड सिनेमा क्षेत्रातले नामवंत संगीतकार आहेत. त्यांच्या संगीत रचनेसाठी गायला मिळणे हा धितीच्या आवाजाचा ही एक प्रकारे गौरव आहे.

धिती तिच्या शाळेच्या ‘कॉयर ग्रुप’मधून गायची. ती नववी इयत्तेत असताना सुप्रसिद्ध गायिका लोर्नाने म्हटलेले ‘ओपघात केलो’ हे गाणे तिंने आपल्या आवाजात म्हटले होते. धितीने गायलेल्या त्या गाण्याचा व्हिडिओ (Video) त्यावेळी बराच वायरल झाला होता. ‘777 चार्ली’ सिनेमाची टीम, त्यांच्या सिनेमात असलेल्या या कोकणी गाण्यासाठी एका योग्य आवाजाच्या शोधातच होते. कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या पाहण्यात धितीचा हा व्हिडिओ आला. त्यानंतर त्यांनी तिच्या वडिलांकडे संपर्क साधला. अर्थात या गाण्याचे गीतकार साई पाणंदीकर यांनीही दरम्यान तिच्या नावाची शिफारस सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे केली होती. मग पुढची सारी प्रक्रिया घडत गेली.

धितीच्या आवाजातून हे गाणे (Song) सिनेमाच्या टिमला (घरीच) रेकॉर्ड करून पाठवल्यानंतर त्यांना ते पसंत पडले आणि पणजीच्या गेरा एम्पोरियममध्ये असलेल्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओत हे गाणे रेकॉर्डिंग केले गेले या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. आज तंत्रज्ञान (Technology) इतके प्रगत झालेले आहे की पणजीच्या (Panji) स्टुडिओत गाणे रेकॉर्ड होत असताना, बंगळूर (Bengaluru) इथल्या दुसऱ्या साऊंड स्टुडिओत बसून संगीत दिग्दर्शक नॉबिन आणि त्यांची टीम ते ऐकत होती व तिथून ते तिला मार्गदर्शनही करत होते. पहिल्या रिकॉर्डिंगनंतर त्यात काही कमतरता आढळल्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा ते त्याच स्टुडिओत रेकॉर्ड करण्यात आले. अशातऱ्हेने धितीचे पहिले स्वतंत्र गाणे जन्माला आले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात रेकॉर्ड झालेले हे गाणे 31 डिसेंबरला युट्युबवर (You Tube) रिलीज झाले आणि त्यानंतर केवळ अवघ्या दिवसात ते लाखो लोकांनी पाहिले. युट्युबवर (You Tube) सध्या गाजत असलेल्या धितीच्या या गाण्याचे बोल आहेत, ‘ओ गा, थोडे खीण या जिणेचे सारया....’. सिनेमा (Movie) लवकरच रिलीज (Release) होणार आहे पण दरम्यान हे गाणे मुद्दाम ऐकाच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT