weight loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea For Weight Control: वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी चहा पिणे योग्य?

Tea For Weight Control: यासाठी तुम्हाला तुमची चहा बनवण्याची आणि पिण्याची पद्धत बदलावी लागेल.

दैनिक गोमन्तक

Tea For Weight Control: सकाळचा चहा हा आपल्यापैकी अनेकांच्या दिनचर्येतील महत्वाचा भाग असतो. अनेकांना चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात केल्यासारखी वाटत नाही. मात्र ज्यांना आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांच्या इतर डाएटबरोबर चहावर देखील पाबंदी घातली जाते.

आपल्यापैकी अनेकांना चहा बंद करणे अवघड वाटते. मात्र सकाळचा चहा पिऊनदेखील वजन कमी करता येते हे तुम्हाला माहीत आहे का? यासाठी तुम्हाला तुमची चहा बनवण्याची आणि पिण्याची पद्धत बदलावी लागेल.

चहामधील कोणत्या घटकामुळे वजन वाढते?

1. साय असलेले दूध: चहामध्ये हे साय असलेले दूध घातले तर तुमच्या चहामधील कॅलरीजचे प्रमाण वाढून तुमचे वजन वाढू शकते. दुधामध्ये फॅट असते आणि चहामध्ये जास्त प्रमाणात दूध घातले तर वजन वाढू शकते. एक कप चहामध्ये 33-66 कॅलरीज प्रति दुधाची फॅट असते. त्यामुळे स्किम्ड दूधाचा वापर तुम्ही चहासाठी करु शकता. याशिवाय तुम्ही ब्लॅक टीचे सेवन करु शकता.

2. साखर: कमी साखरेचा किंवा गुळाचा चहा तुम्ही पिऊ शकता.

3. चहासोबत तुम्ही बिस्किट किंवा इतर खाद्यपदार्थ खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते.

  • वजन कमी करण्यासाठी चहावर बंदी घालणे अनिवार्य आहे का?

वजन कमी करण्याच्या बाबतीत, संयम ही गुरुकिल्ली आहे, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणे. जास्त चहा, जास्त कॅफीन आणि त्यात मिळणारे अनहेल्दी कंपाऊड्स यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला दिवसातून खूप वेळा चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही त्याचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर दिवसातून दोन वेळा चहाचे प्रमाण सिमित केले तर त्याचा फायदा तुम्हाला दिसू शकतो.

  • जेवणाआधी चहा पिण्याचे काय होतात परिणाम

जेवणाच्या आधी किंवा नंतर लगेच चहा प्यायल्याने पचन होण्यास अडचण निर्णाण होते. तुमचे वजन कमी करण्यासाठी चहा पिणे आणि जेवण यामध्ये किमान 30 मिनिटांचे अंतर राखण्याचा सल्ला दिला जातो.

  • झोपण्यापूर्वी चहा?

झोपण्यापूर्वी चहा प्यायल्यास झोपेची पद्धत आणि पचन बिघडते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे कारण चांगली झोप तुमच्या शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करत असते. त्यामुळे झोपण्याआधी चहा पिण्याची सवय असेल तर ती तात्काळ बंद केली तर तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजन कमी होण्यासदेखील मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT