Health In Monsoon: पावसाला सुरुवात झाली असून या ऋतुत आपल्यापैकी अनेकांना विविध चवदार पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाहीत. त्यामुळे चमचमीत पदार्थ हमखास खाल्ले जातात. मात्र पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप आणि डेंगू-मलेरियासारखे आजारही लवकर होतात.
इतर अनेक कारणांसहित आपण घेत असलेला आहार हादेखील कारणीभूत ठरतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि प्रसिद्ध डायटिशन रुजुता दिवेकर यांनी म्हटल्यानुसार, जेव्हा ऋतु बदलतो तेव्हा डाएटदेखील बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे या ऋतुत काय खाल्ले पाहिजे आणि आपली इम्युनिटी चांगली ठेवली पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
1. तुळस
तुळस ही अशी वनस्पती आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरापुढे हमखास आढळते. अनादी काळापासून तुळशीला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. हीच तुळस आपले आरोग्य तंदरुस्त ठेवण्याचे काम करते.
तुळशीची पाने केवळ रोगच बरे करत नाहीत तर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करतात. तुम्ही तुळशीची पाने थेट खाऊ शकता किंवा हर्बल चहा बनवून त्याचे सेवन करु शकता. याशिवाय सुपमध्येदेखील तुळशीच्या पानांचा वापर करु शकता.
2. आलं
आल्यामध्ये जिंजेरॉल, पॅराडोल्स, सेस्क्युटरपेन्स, शोगाओल्स आणि झिंगेरोन भरपूर प्रमाणात असतात, या सर्वांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. तुम्हाला जर सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होत असेल तर आलं नेहमीच उपयुक्त ठरते.
3. काळी मिरी
मुख्यत: काळी मिरी जेवणाची चव वाढवतात. मात्र आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काळी मिरी उपयुक्त ठरते. काळ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे घटक आढळतात ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात.
4. कढीपत्ता
पावसाळ्यात संसर्ग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. संसर्ग टाळण्यासाठी कढीपत्ता वापरता येतो. कढीपत्त्यात अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म देखील आढळतात जे आपल्याला जंतूपासून संरक्षण करण्यास मदत करतात. कढीपत्त्यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्याचे काम करतात.
5. लिंबू
पावसाळ्यात लिंबासारखी आंबट फळे खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. वास्तविक, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स देखील आहेत हे जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.