Sun Rays Treatment Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sun Rays Treatment: त्वचाविकारांवर 'सूर्यकिरण चिकित्सा' फायदेशीर

शारीरिक आणि मनोशारीरिक आजार बरे करण्यासाठी ‘सूर्यकिरण चिकित्सा पद्धती' पूरक म्हणून वापरल्यास अधिक फायदा होतो’, असे अभ्यासकांचे मत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

(Physical and mental illness) शारीरिक आणि मनोशारीरिक आजार बरे करण्यासाठी आपण योग्य वैद्यकीय उपचार घेतो, पण या उपचारांबरोबरच ‘सूर्यकिरण चिकित्सा नावाची एक पर्याय उपचार पद्धती पूरक म्हणून वापरल्यास अधिक फायदा होतो’, असे अभ्यासकांचे मत आहे.  सूर्यकिरणातील रंगांचा वापर करून रुग्णावर उपचार करण्याचे एक वेगळे तंत्र अलीकडे विकसित होताना दिसत आहे.  सूर्य हा तेजस्वी आहे. अग्निमेय आहे.

 पण ते तेज आणि अग्नी पृथ्वीवर सगळीकडेच व्यापलेला असल्याने त्याची तीव्र उष्णता आपल्याला जाणवत नाही. सूर्यप्रकाशात बहिर्गोल भिंग घेऊन त्यावर सूर्यकिरणे पाडले असता त्या भिंगांच्या पलीकडे एक तेजस्वी प्रकाश बिंदू बाहेर पडतात. कापूस किंवा दुसरा कोणताही ज्वालाग्रही पदार्थावर तो तेजस्वी बिंदू पाडला असता तो पदार्थ काही वेळातच पेट घेत असल्याचा प्रयोग आपण शालेय जीवनात केलाय. या वरून आपल्याला सूर्याच्या उष्णतेचा प्रत्यय येतो.

सूर्यकिरणातील रंग:-

सूर्याचा रंग पांढरा स्वच्छ पांढरा आहे. पण त्यात तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, अस्मानी आणि जांभळा हे सात सात रंग एकवटलेले आहेत. सूर्यकिरणात असलेल्या सात रंगांमुळेच सूर्याला ‘सप्तरश्मी’ असे संबोधले जाते. सूर्यकिरण चिकित्सेमध्ये सूर्यकिरणातील सातही रंगांचा प्रभाव वेगवेगळ्या स्वरूपाचा मानला जातो.

लाल रंग- हा रंग शरीरातील रक्त, स्नायू आणि पेशी यांना उत्तेजित करतो.  शरीर थंड पडणे, अंगातील उत्साह कमी होणे, वात, कफ रोग होणे या व्याधीवर फायदा होतो

नारंगी रंग- याचे गुणधर्म लाल रंगाप्रमाणेच आहेत पण त्याचे प्रमाण सौम्य आहे.

पिवळा रंग- हा रंग यकृत, प्लीहा यांना शक्ती देणारा लघवी, शौच यावर नियंत्रण ठेवणारा, बुद्धी विकसित करणारा आणि प्रसन्नता वाढवणारा मानला जातो.

हिरवा रंग- हा रंग शांती आणि थंडावा देणारा मानला जातो.

निळा रंग- हा रंग तापनाशक, थंड मानला जातो. उष्णता विकार, गर्मी वाढणे, जीव घाबरा होणे यासाठी उपयोगी समजला जातो.

अस्मानी रंग- हा रंग वेदना, त्वचारोग बरा करणारा समजतात. जखमा बऱ्या करून सडण्याची क्रिया थांबवतो असे मानले जाते.

जांभळा रंग- हा रंग फुफ्फुसाचे रोग, रक्तातील दोष कमी करतो.  झोप चांगली आणतो असे मान्यण्यात येते.

सूर्यकिरण चिकित्सेची पद्धत:-

सूर्यकिरण चिकित्सेसाठी सूर्यकिरणांचा वापर करून सूर्यकिरण जल तयार करतात.  त्यासाठी वरील सात रंगांच्या बाटल्या वापरल्या जातात. विशिष्ट रंगांच्या बाटलीमध्ये शुद्ध पाणी भरून ती बाटली सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सूर्यप्रकाशामध्ये ठेवली जाते. ही बाटली पाटावर किंवा लाकडी फळीवर ठेवावी. कारण त्यामुळे पाण्यामध्ये प्रविष्ट झालेली सूर्य किरणांची शक्ती जमिनीमध्ये जात नाही.

काचेच्या बाटलीच्या रंगामुळे सूर्याचा विशिष्ट रंग त्या पाण्यामध्ये उतरतो असे म्हणतात. संध्याकाळी पाचच्या नंतर ती बाटली घरात न्यावी आणि त्याच रंगाच्या कागदात किंवा स्वच्छ जाड पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवावी. बाटल्या एकत्र ठेवायच्या झाल्यास त्यांचे प्रतिबिंब एकमेकांवर पडायला देऊ नये.  दिवसा वातावरण ढगाळ असेल किंवा सूर्यकिरणे कमी होऊन वातावरण दमट असेल तर पाण्याच्या बाटल्या बाहेर ठेवू नयेत.

या पद्धतीने तयार झालेले सूर्य जल त्या विशिष्ट आजारासाठी दिवसातून पाच ते सहा वेळा पूर्ण बाटलीभर दिले जाते.  अर्थात त्याचबरोबर योग्य ती वैद्यकीय ट्रीटमेंट चालू ठेवणे आवश्यकच आहे.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vishwajit Rane: 'मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमागे मी धावत नाही'! राणेंचे स्पष्टीकरण; मोदींचे नेतृत्व बघून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा खुलासा

Goa Politics: खरी कुजबुज; सरकारवर भरोसा नाय बा!

Madkai Firing: गूढ वाढले! मडकईत गाडीवर गोळीबार; भाजप नेता थोडक्यात बचावला

Goa Crime: 'स्कॅन करा, ड्रग्ज मिळवा'! पणजी पोलिस स्थानकाजवळ पोस्टर; माफिया करत आहेत डिजिटल तस्करी ?

Goa Politics: 36 तास उलटले तरी कामत, तवडकर यांना खातेवाटप नाही! 'अमावस्ये'मुळे निर्णय रखडल्याची चर्चा

SCROLL FOR NEXT