Side Effects Of Drinking Water: जास्त पाणी पिणेही ठरु शकते आरोग्यासाठी घातक

Drinking Water Tips: पाण्याचे अतिसेवन करणे देखिल धोकादायक ठरू शकते.
Side Effects Of Drinking Water
Side Effects Of Drinking WaterDainik Gomantak
Published on
Updated on

निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणे फायदेशीर असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच त्वचा आणि शरीरातील विषारी कण काढून टाकण्याचे काम करते. पाण्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. पण तुम्‍हाला माहिती आहे का पाणी पिण्याचे तोटे देखिल आहेत.

  • हायपोनेट्रेमिया होऊ शकतो

जास्त पाणी पिल्याने शरीरात द्रवपदार्थाचा अतिरिक्त भार आणि शरीरात असंतुलन होऊ शकते. जास्त पाणी शरीरात सोडियमची पातळी कमी करू होउ शकते. ज्यामुळे मळमळ, उलट्या, पेटके, थकवा आदी स्थिती हायपोनेट्रेमिया म्हणून ओळखली जाते.

  • डोकेदुखी होऊ शकते

डोकेदुखी हे अति-हायड्रेशन आणि डिहायड्रेशन या दोन्हीचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही जास्त पाणी (Water) पितात, तेव्हा तुमच्या रक्तात मीठाची कमतरता असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व अवयवांना सूज येते.

  • इलेक्ट्रोलाइट पातळी कमी होते

जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा तुमची इलेक्ट्रोलाइट पातळी कमी होते आणि संतुलन बिघडते. कमी इलेक्ट्रोलाइट पातळीमुळे स्नायू पेटके सारखी लक्षणे उद्भवू शकतात.

Side Effects Of Drinking Water
Astro Tips for Anger: नाकावरच्या रागाला औषध काय? रागाचा ग्रहांशी संबंध आणि त्याचे उपाय
  • थकवा जाणवू शकतो

पाणी जास्त पिल्याने थकवा येऊ शकतो. तुमच्या शरीरातून तुम्ही प्यालेले पाणी फिल्टर करण्यासाठी आणि तुमच्या रक्तप्रवाहातील द्रव पातळी संतुलित करण्यासाठी मूत्रपिंड जबाबदार असतात. जास्त पाण्याने, तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागेल, तुमच्या हार्मोन्सवर ताण पडेल, ज्यामुळे तुमचा थकवा वाढू शकतो.

  • पोटॅशियमची कमतरता होऊ शकते

जास्त पाणी सेवन केल्याने पोटॅशियमची कमतरता होऊ शकते, जे एक आवश्यक पोषक आहे. यामुळे पाय दुखणे, जळजळ होणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

  • वारंवार लघवीला जावे लागते

जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पितात तेव्हा तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या होते. जास्त पाणी प्यायल्याने त्यातील पोषक तत्व शरीरात शोषले जात नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com