Liver Diseases Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Liver Diseases: सूर्यप्रकाश अन् यकृताच्या आजारांमध्ये काय आहे संबंध? संशोधनातून खुलासा

Liver Diseases: सूर्यप्रकाश आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. तो व्हिटॅमिन डी प्रदान करतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की सूर्यप्रकाश आणि यकृताच्या आजारांमध्ये देखील संबंध आहे.

Manish Jadhav

सूर्यप्रकाश आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. तो व्हिटॅमिन डी प्रदान करतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की सूर्यप्रकाश आणि यकृताच्या आजारांमध्ये देखील संबंध आहे. सूर्यापासून येणाऱ्या किरणांमुळे यकृताच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. होय, चकीत झालात ना... नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. संशोधनानुसार, सूर्यप्रकाश यकृताची जळजळ कमी करु शकतो, ज्यामुळे व्यक्तीला फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो. जर लिव्हर फॅटी नसेल तर त्याच्याशी संबंधित इतर कोणत्याही आजाराचा धोका देखील कमी होतो.

संशोधनानुसार, सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या (UVR) संपर्कात आल्यानंतर त्वचा व्हिटॅमिन डी आणि नायट्रिक ऑक्साईड तयार करते. यूव्हीआरच्या संपर्कात आल्याने यकृताची जळजळ कमी होते आणि अल्कोहोलिक नसलेल्या फॅटी लिव्हर रोगापासून बचाव होऊ शकतो. तथापि, या राइजरवर अजूनही अधिक चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या अद्याप त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून व्हिटॅमिन डी चे पूर्ण फायदे अद्याप ज्ञात नाहीत.

यकृताच्या फायब्रोसिसपासून देखील संरक्षण करते

संशोधनात पुढे सांगण्यात आले की, सूर्यप्रकाशामुळे यकृताची जळजळ कमी होते. हे हेपॅटोसाइट एपोप्टोसिस आणि लिव्हर फायब्रोसिस टाळण्यास मदत करते. सूर्यप्रकाश मायक्रोबायोमला बळकटी देऊन आम्ल निर्मितीची प्रक्रिया देखील सुधारतो. सूर्यप्रकाशासोबतच, नायट्रिक ऑक्साईड देखील लिव्हरची जळजळ कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, परंतु या संशोधनावरील चाचण्या अजूनही सुरु आहेत. प्राण्यांवर केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, सूर्यप्रकाशामुळे यकृताच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तथापि, हे संशोधन अद्याप मानवांवर झालेले नाही. हे संशोधन फक्त प्राण्यांच्या मॉडेल्सवर आधारित आहे.

तज्ञ काय सांगतात?

मेडिसिनचे डॉ. सुभाष गिरी सांगतात की, सूर्यप्रकाशामुळे मानवांमध्ये यकृताच्या आजाराचा धोका कमी होतो याचा कोणताही ठोस पुरावा नाही, परंतु प्राण्यांवर केलेल्या संशोधनात त्याचे फायदे दिसून आले आहेत. यकृत आणि सूर्यप्रकाश यांच्यातही एक संबंध आहे. आपल्याला सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी मिळते आणि व्हिटॅमिन डी चे सक्रिय स्वरुपात रूपांतर करण्यात यकृत महत्त्वाची भूमिका बजावते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT