Fatty Liver: अल्कोहोलिक की नॉन-अल्कोहोलिक? कोणता फॅटी लिव्हर सर्वाधिक धोकादायक? जाणून घ्या कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Non-Alcoholic Fatty Liver Disease: फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत, यापैकी एक हा दारु पिण्यामुळे होणारा आजार. वैद्यकीय भाषेत याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. मात्र काही लोक दारु पीत नाहीत तरीही त्यांचे लिव्हर फॅटी होत असेल तर त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात.
Non-Alcoholic Fatty Liver Disease
Fatty LiverDainik Gomantak
Published on
Updated on

फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत, यापैकी एक हा दारु पिण्यामुळे होणारा आजार. वैद्यकीय भाषेत याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. मात्र काही लोक दारु पीत नाहीत तरीही त्यांचे लिव्हर फॅटी होत असेल तर त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. हे लिव्हरचे दोन वेगवेगळे आजार आहेत. जे सुरुवातीला सामान्य दिसतात, पण नंतर ते लिव्हर निकामी होण्यास कारणीभूत ठरतात. मग अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, दारु पिण्यामुळे लिव्हर खराब होण्याचा जास्त धोकादायक असतो की वाईट खाण्याच्या सवयींमुळे. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

डॉक्टर सांगतात की, जेव्हा लिव्हरमध्ये फॅट निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला 'फॅटी लिव्हर' म्हणतात. जर यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर दोन्ही स्थितींमुळे जळजळ, व्रण (फायब्रोसिस) आणि लिव्हरचा सिरोसिस देखील होऊ शकतो. सिरोसिसनंतर स्थिती गंभीर होऊन लिव्हर खराब होते. अशा परिस्थितीत, ट्रान्सप्लांटची देखील गरज भासू शकते.

Non-Alcoholic Fatty Liver Disease
Fatty Liver Disease : धक्कादायक ! गोव्यात फॅटी लिव्हर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

गेल्या दशकात भारतात लिव्हरच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. लिव्हर निकामी होत असल्याने ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत, हा अवयव निरोगी ठेवणे गरजेचे ठरते. यासाठी तुम्हाला अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरबाबत माहिती असायला हवी. लिव्हर फॅटी का होते आणि अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि कोणते जास्त धोकादायक आहे ते जाणून घेतले पाहिजे.

अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (AFLD)

जास्त प्रमाणात दारु पिणाऱ्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो. दारु पचवण्यास लिव्हर संघर्ष करते, ज्यामुळे फॅट तयार होते आणि ते लिव्हरच्या पेशी खराब करते. दारु पिणे सुरुच राहिल्यास AFLD अल्कोहोलिक हेपेटायटीस, फायब्रोसिस आणि शेवटी सिरोसिस किंवा लिव्हर निकामी होण्यास कारणीभूत ठरु शकते, जे जीवघेणे आहे. यामुळे मृत्यू (Death) देखील होऊ शकतो.

Non-Alcoholic Fatty Liver Disease
Liver Cirrhosis Deaths In Goa: गोमंतकीयांनो सावधान! मद्यपान ठरतेय धोकादायक; लिव्हर सिरोसिसमुळे गोव्यात दरवर्षी 300 मृत्यू

मुख्य धोके काय आहेत?

जास्त प्रमाणात दारु पिणे

पोषक तत्वांची कमतरता

हिपॅटायटीस बी किंवा सी सारखे संक्रमण

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD)

NAFLD चा दारु सेवनाशी काहीही संबंध नाही. त्याऐवजी, हा आजार खालील कारणांमुळे घडतो

लठ्ठपणा

टाइप 2 मधुमेह

हाय कोलेस्ट्रॉल

Non-Alcoholic Fatty Liver Disease
Cloves Health Benefits: लवंग एक प्रभावी औषध, अनेक आजारांवर रामबाण उपाय

कोणते जास्त धोकादायक आहे?

सीके बिर्ला रुग्णालयातील जीआय आणि बॅरिएट्रिक सर्जरी विभागाचे संचालक डॉ. सुखविंदर सिंग सग्गु सांगतात, हे दोन्ही आजार धोकादायक आहेत. यामुळे लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर (Cancer) आणि पुढे मृत्यू देखील होऊ शकतो. तथापि, गेल्या काही वर्षात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हा आजार गंभीर होईपर्यंत कोणीही त्याकडे लक्ष देत नाही.

दुसरीकडे, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे लवकर निदान करणे कठिण जाते. तो शांतपणे वाढत राहतो आणि जेव्हा तो अचानक गंभीर रुप धारण करते तेव्हाच तो स्पष्ट होतो.

Non-Alcoholic Fatty Liver Disease
Liver Health Tips : यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा या 7 सोप्या टिप्स; प्रत्येकासाठी आहेत महत्वाच्या

लिव्हर निरोगी कसे ठेवावे

दारु पिणे मर्यादित करा किंवा टाळा, विशेषतः जर तुम्हाला आधीच लिव्हरची समस्या असेल तर

नियमित व्यायामाद्वारे वजन नियंत्रणात ठेवा.

फळे, भाज्या खा.

जास्त प्रमाणात मैदा खाणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com