
Goa Reports Over 300 Deaths Annually Due To Liver Cirrhosis
पणजी: जर तुम्ही मद्यपान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. लिव्हर सिरोसिसमुळे गोव्यात दरवर्षी 300 हून अधिक मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दर महिन्याला या आजाराचे 140 ते 160 रुग्ण दाखल होतात. खासकरुन गेल्या काही वर्षात गोव्यात यकृताच्या आजारासंबंधीच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
अल्कोहोलिक्स अनॉनिमस (एए) सोबत जवळून काम करणारे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, ''दीर्घकालीन यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या तरुण रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दोन ते तीन दशकांपूर्वी आम्हाला यकृताच्या सिरोसिसचे चाळीशी किंवा पन्नाशीच्या वयातील रुग्ण दिसायचे, पण आता वीशीतील रुग्ण पाहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड दिसत आहे.''
पाटील यांनी पुढे सांगितले की, रुग्णालयात महिन्याला सुमारे 300 मृत्यूंची नोंद होते, त्यापैकी 30 टक्के मृत्यू मद्यपान किंवा मद्यपानाशी संबंधित घटनांमुळे होतात.
वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तसेच वैद्यकीय क्षेत्रात मद्यपानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मद्यपानाबाबत जागरुकता निर्माण करुन जास्तीत जास्त लोकांना यापासून कसे परावृत्त करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सेंटर फॉर मेंटल हेल्थ अॅडव्होकेसी, रिसर्च अँड ट्रीटमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक डॉ. आशिष देशपांडे म्हणाले.
देशपांडे पुढे म्हणाले की, एका अभ्यासानुसार, भारतात एक तृतीयांश आत्महत्या दारुमुळे होतात. कोणत्याही सरकारी रुग्णालयात नोंदवलेल्या घरगुती हिंसाचाराच्या दोन तृतीयांश घटना, नोकरीवर गैरहजर राहण्याची 40 टक्के प्रकरणे आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतील 80 टक्के प्रकरणे मद्यपानाशी संबंधित आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.